निवडक कथा
Authors:
ISBN:
₹75.00
- DESCRIPTION
- INDEX
कथा हा वाङ्मय प्रकार अतिशय लवचिक असतो. जीवनातले विविध ताण-तणाव, प्रसंग, घटना कथेच्या केंद्रस्थानी असतात. मराठी कथेचा प्रवाह लोककथा, जातककथा, जातककथा, इसापनिती, पंचतंत्र इत्यादीनी समृद्ध आहे. प्रत्येक काळात त्यात भर पडतच आहे. साहित्याने जग अधिक सुंदर, लोभस, मोहक करावे हा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. अनुभवाची श्रीमंती, समृद्धी हेच साहित्यिकांचे खरेखुरे वैभव असते. उत्कट जिज्ञासेपोटी व संवेदनशील मनातून चांगल्या साहित्याची निर्मिती होते. ‘निवडक कथा’ निवडताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा निश्चितपणे विचार केलेला आहे. या कथा तरुणाईला भावतील अशाच आहे. कथांची निवड करताना मूल्य, संस्कार यांना निश्चितच महत्त्व दिले आहे. कथांमधून उमद्या भावनांना निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल व विद्यार्थ्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वासाठी ह्या कथा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास वाटतो.
Nivadak Katha
- हत्तीचा दृष्टान्त – केसोबास
- राजसंन्यास – मूळ कथा खलिल जिब्रान- अनु. वि. स. खांडेकर
- नागीण – चारुता सागर
- स्वर्ग – अनिल अवचट
- स्फोट – जयंत नारळीकर
- पंढरीची वाट – चंद्रकुमार नलगे
- घुसमटणी – किशोर घोरपडे
- सुगरनचा खोपा – प्रतिमा इंगोले
- पाऊस – श. रा. राणे
- डंगरा – रवींद्र पांढरे