Prashant Publications

My Account

निवडक दहा कथा - आशय आणि स्वरूप

Authors: 

ISBN:

SKU: 9789395227353
Marathi Title: Nivadak Daha Katha - Aashay Aani Swarup
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 248
Edition: First
Category:

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

“कथा हा मानवी अभिव्यक्तीचा मूलभूत प्रकार आहे. लोककहाणीच्या परंपरेतून प्रवाहित झालेल्या या अभिव्यक्तीच्या रीतीने आधुनिक काळात स्फुट कथा, लघुकथा, नवकथा, दीर्घकथा, लघुत्तम कथा या लिखित रुपांमधून मराठी कथेने प्रवास केलेला आहे. कथेच्या संरचनेत होत गेलेली ही स्थित्यंतरे समजून घेतानाच हेही ध्यानात घ्यायला हवे की, विशेषत: 1960-70 च्या दशकानंतर जीवनाशयाची विभिन्न रुपे केंद्रस्थानी ठेवून मराठी कथा आकाराला येऊ लागली. समाजवास्तवाच्या अंतरंगात शिक्षण, लोकशाही व्यवस्था आणि सामजिक आंदोलने यांच्या रेट्यामुळे होत गेलेली स्थित्यंतरे विभिन्न समूहस्तरांच्या जीवनजाणिवा लेखनाविष्काराच्या केंद्रस्थानी आणण्यास कारणीभूत ठरली. त्याचाच परिपाक म्हणून दलित, कृषिजन, स्त्रीवादी/स्त्रीकेंद्री, मुस्लिम, आदिवासी, विज्ञान व महानगरीय कथासाहित्याचे प्रवाह गतिमान होत गेले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या प्रवाहांचे प्रातिनिधिक लेखन पोहचविण्याच्या भूमिकेतून सदर अभ्यासक्रमाच्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. खेड्यापाड्यातील युवामनांच्या भावनिक व वैचारिक भरणपोषणाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी कशी उपयुक्त ठरु शकते याचा एक उत्तम नमुना स्वायत्ततेअंतर्गत सिद्ध झालेले सदर पुस्तक प्रस्तुत करते.”

– आशुतोष पाटील

Nivadak Daha Katha – Aashay Aani Swarup

भाग एक – निवडक दहा कथा

  1. बाबल्याची कढई – वा. रा. सोनार
  2. डिलिव्हरी – बाळ फोंडके
  3. लाल चिखल – भास्कर चंदनशिव
  4. बेगड – योगीराज वाघमारे
  5. दु:ख आणि अश्रू – ललिता गादगे
  6. प्रॉपर्टी एक्झिबिशन – किरण येले
  7. मडकं गेलं वाहून – नीरजा
  8. कमाई – रफीक सूरज
  9. दिल से – संजीव गिरासे
  10. वेटर – सुनील गायकवाड

भाग दोन – निवडक दहा कथा : आशय आणि स्वरूप

  1. ग्रामविनोदाचे अनोखे विश्व उभे करणारी कथा : ‌‘बाबल्याची कढई’ – प्रा.योगेश पाटील
  2.  मातृत्व बाजाराच्या दाहकतेचे चित्रण : ‌‘डिलिव्हरी’ – प्रा. ज्ञानेश्वर कांबळे
  3. शेतकऱ्यांचा आक्रोश मांडणारी कथा : ‌‘लाल चिखल’ – डॉ. रमेश माने
  4. बेगडी वृत्तीचे दर्शन : ‌‘बेगड’ – डॉ. विलास गावीत
  5. स्त्रीचे सनातन दुःख मांडणारी कथा : ‌‘दु:ख आणि अश्रू’ – डॉ. योगिता आशुतोष पाटील
  6. यंत्रयुगात उद्ध्वस्त झालेल्या सामान्य माणसाची हेलावून टाकणारी कथा : ‌‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’ – डॉ. योगेश महाले
  7. स्त्री जाणिवेचे प्रभावी चिंतन : ‌‘मडकं गेलं वाहून’ – डॉ. अक्षय घोरपडे
  8. मानवी जगण्यातील संघर्षाचे व्यापक चित्रण : ‌‘कमाई’ – डॉ. संदीप माळी
  9. ग्रामीण प्रेमसुलभ भावनेचे अनोखे दर्शन : ‌‘दिल से’ – डॉ. निलेश पाटील
  10. मानवी नात्याच्या विविध पैलूंचे दर्शन : ‌‘वेटर’ – डॉ. अतुल देशमुख
RELATED PRODUCTS
You're viewing: निवडक दहा कथा – आशय आणि स्वरूप 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close