Prashant Publications

My Account

परिचयात्मक अर्थशास्त्र

Introductory Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789394403611
Marathi Title: Parichyatmak Arathashastra
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 352
Edition: First

395.00

  • DESCRIPTION
  • INDEX

मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचं अध्ययन करण्याचं महत्त्वाचं कार्य अर्थशास्त्र करते. ही मानवी वर्तणूक उपभोक्ते, उत्पादक, वितरक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. त्यांचे कार्य अर्थव्यवसथेला गतिमान करणार ठरते. यातून अर्थशास्त्रीय ज्ञानशाखा उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण यांचे सैद्धांतिक विश्लेषण करतात. यासाठी रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्रीय अभ्यास शाखांचे दोन भागात विभाजन केले आहे. (1) सूक्ष्मलक्षी अध्ययन (2) समग्रलक्षी अध्ययन. हे विभाजन आर्थिक विकासाची धोरणे निश्चित करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या दोन्ही अभ्यासशाखांच्या आधारावरच ‌‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या क्रमिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांची व त्यांची व्यावहारिक प्रासंगिकता कशी महत्त्वपूर्ण आहे याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्यात अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी, त्याला आपल्या भविष्याला आकार देता यावा व सामान्य माणसांच्या आर्थिक प्रश्नांची त्याच्यात समज निर्माण व्हावी, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने धडपड करावी हा प्रयत्न आहे.
म्हणून या पुस्तकात मागणी, पुरवठा, रोजगार, पैसा, आधुनिक बँकींग, व्यापार, सरकारचे उत्पन्न-खर्च, आर्थिक विकास, नियोजन आयोग, निति आयोग, व्यावसायिक जीवनातील सांख्यिकीचे योगदान, या संकल्पनांची त्याला ओळख होण्यास मदत होईल. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.

Parichyatmak Arathashastra

  1. सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आणि अर्थ – संपत्ती, कल्याण, दुर्मिळता आणि आधुनिक, 1.2 मागणी : अर्थ आणि व्याख्या – (अ) मागणीचा सिद्धांत, (ब) मागणी ठरविणारे घटक, (क) मागणीची वृद्धी आणि ऱ्हास, (ड) मागणीची लवचिकता : अर्थ, 1.3 पुरवठा : अर्थ – (अ) पुरवठ्याचा सिद्धांत, (ब) पुरवठा ठरविणारे घटक, (क) पुरवठ्यातील वृद्धी आणि ऱ्हास. 1.4 मूलभूत संकल्पना : संयंत्र, उत्पादन संस्था, उद्योग, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार, द्विजनाधिकार, (अ) पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती, (ब) मागणी आणि पुरवठा समतोल, (क) मुल्य विरोधाभास, (ड) मागणी-पुरवठ्यातील बदल आणि किंमत समतोल, (इ) कालघटकांचे महत्त्व आणि किंमत निश्चिती.
  2. स्थूल/समग्र अर्थशास्त्राचा परिचय : 2.1 स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या, 2.2 राष्ट्रीय उत्पन्न, (अ) अर्थ, संकल्पना आणि मोजमाप, (ब) राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापातील अडचणी, (क) राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह – खुली अर्थव्यवस्था, 2.3 रोजगार आणि उत्पादनाचे सिद्धांत, (अ) ‌‘से’ चा बाजार विषयक सिद्धांत, (ब) जागतिक महामंदी, (क) प्रभावी मागणीचे तत्व, (ड) पूर्ण रोजगार आणि अपूर्ण रोजगार समतोल, (इ) प्रभावी मागणीचे महत्व.
  3. पैसा आणि बँक यांचा परिचय : 3.1 पैसा : अर्थ, (अ) विनिमय पद्धती, (ब) पैशाची उत्क्रांती, (क) पैशाची व्याख्या, (ड) पैशाची कार्ये, 3.2 बँकींग, (अ) व्याख्या आणि अर्थ, (ब) बँकांची कार्ये, 3.3 मध्यवर्ती बँक, (अ) व्याख्या आणि अर्थ, (ब) मध्यवर्ती बँकेची कार्ये, 3.4 बँकींग क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, (अ) आवश्यकता, महत्त्व, नवतंत्रज्ञानाची बँकींग क्षेत्रातील भूमिका आणि लाभ, (ब) एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इएफटी, इसीएस, आरटीजीएस, एनईएफटी, एनएसएस, ई-खरेदी/ई-पैसा, मोबाईल बँकींग, इंटरनेट बँकींग, कोअर बँकींग, आभासी बँकींग, आण्ाि आभासी कार्ड, एफटीपी ऑफ एस, रोखरहीत व्यवहार, 3.5 बँकींग व्यवहारात नवतंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी.
  4. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सार्वजनिक आय-व्यय : 4.1 आंतरराष्ट्रीय व्यापार, (अ) अर्थ, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य-भेद, (ब) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पाया, (क) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातनवादी सिद्धांत (ॲडम स्मिथ), (ड) आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे, (इ) विनीमय दर : अर्थ आणि प्रकार. 4.2 सार्वजनिक आय-व्यय, (अ) अर्थ, व्याख्या आणि सार्वजनिक आय-व्ययाचे महत्त्व, (ब) सार्वजनिक खर्च : अर्थ, भूमिका, तत्वे, वर्गीकरण आणि सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, (क) सार्वजनिक उत्पन्न : अर्थ, कर आणि करेतर उत्पन्न, करांचे वर्गीकरण आणि अर्थव्यवस्थेत करांची भूमिका, (ड) सार्वजनिक कर्ज : अर्थ, उद्दिष्ट्ये, प्रकार, महत्त्व, (इ) अंदाजपत्रक : अर्थ, प्रकार, तुटीचे अंदाजपत्रक.
  5. आर्थिक विकास आणि नियोजन : 5.1 आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी, (अ) अर्थ, (ब) आर्थिक विकासाचे निर्देशक, 5.2 लोकसंख्या, (अ) लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, (ब) अतिरिक्त लोकसंख्येच्या समस्या, (क) आर्थिक विकासातील लोकसंख्येची भूमिका आणि महत्व, 5.3 आर्थिक नियोजन, (अ) अर्थ, व्याख्या, उद्दिष्ट्ये, प्रकार आणि आवश्यकता, 5.4 निती आयोग, (अ) निती आयोगाची रचना, (ब) नियोजन मंडळ आणि निती आयोग यांच्यातील फरक, (क) निती आयोगाची भूमिका, (ड) निती आयोगाचे महत्त्व.
  6. व्यवसायासाठीच्या सांख्यिकीची ओळख/परिचय : 6.1 सांख्यिकीची ओळख/परिचय, (अ) अर्थ, (ब) सांख्यिकीची कार्ये, (क) तथ्य संकलनाचे प्रकार आणि मार्ग किंवा स्त्रोत, (ड) सांख्यिकीचे प्रकार, (इ) व्यवसायासाठी सांख्यिकीचे महत्त्व, (फ) सांख्यिकीच्या मर्यादा, 6.2 केंद्रीय प्रवृत्तीचे अवलोकन, (अ) गणितीय मध्यमान, मध्यांक आणि बहुलक, (ब) मध्यमान, मध्यांक व बहुलक यांच्यातील संबंध, (क) केंद्रीय प्रवृत्तीची उत्तम परिमाणे, 6.3 निर्देशांकाची संकल्पना.
RELATED PRODUCTS
You're viewing: परिचयात्मक अर्थशास्त्र 395.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close