प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र
Advanced Educational Psychology
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
शिक्षणाचे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. शिक्षण प्रक्रिया आणि फलनिष्पत्ती यांच्यात प्रगती करणे, सुधारणा करणे, समस्या सोडविणे ही शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे आहेत. तसेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. मानसशास्त्र हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे. त्यातील सिद्धांत, तत्त्वे, उपपत्ती म्हणजे शास्त्रशुद्ध व वस्तुनिष्ठ संशोधनाचे फलित आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीनुसार मानवात व्यक्तिभिन्नता असते. शरीरयष्टी, रंग, उंची, वजन, स्वभाव वैशिष्ट्ये, अभिरुची, अभिवृत्ती, अभियोग्यता, बुद्धिमत्ता अशा अनंत बाबतीत कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. म्हणूनच मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिविकासाच्या विशिष्ट अवस्था मानल्या आहेत.
या पुस्तकाची व्याप्ती, सखोलता आणि वेगळेपणा विचारात घेतल्यास प्रस्तुत पुस्तक केवळ बी.एड्., एम.एड्., एम.फिल. साठीच उपयुक्त नाही तर नेट, सेट व शिक्षण क्षेत्रातील इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे.
Pragat Shaikshanik Manasshastra
- मानसशास्त्र अर्थ व स्वरुप : मानसशास्त्र, मानसशास्त्राचे स्वरूप, मानसशास्त्राची व्याप्ती, मानसशास्त्राच्या शाखा
- शैक्षणिक मानसशास्त्र : शैक्षणिक मानसशास्त्र – अर्थ, शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षणाचे मानसशास्त्र आहे का ?, शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप, शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती, शैक्षणिक मानसशास्त्राच्या मर्यादा, मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती, शैक्षणिक मानसशास्त्राचे उपयोजन
- वाढ आणि विकास : वाढ आणि विकास – अर्थ व स्वरूप, वाढ आणि विकास यातील फरक, विकासातील स्थित्यंतरे, व्यक्तिविकासाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन / उपागम, विकासाच्या अवस्था, विकासाच्या उपपत्ती
- बालकाचा विकास : बालकाचा शारीरिक विकास, कारक विकास, सामाजिक विकास, नैतिक विकास
- व्यक्तिभेद : व्यक्तिभेद, व्यक्तिभेदाचे स्वरूप, व्यक्तिभेदाची अंगे, व्यक्तिभेदाची कारणे
- व्यक्तिमत्व : व्यक्तिमत्त्व – व्याख्या, व्यक्तिमत्त्वाची अंगे/ मिती, व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिमत्त्व उपपत्ती, वर्गतत्त्व उपपत्ती, गुणतत्त्व उपपत्ती, मनोविश्लेषणवादी उपपत्ती, मानससंघटन उपपत्ती, रूपविरेचनवादी व मानवतावादी उपपत्ती, वर्तनवादी उपपत्ती
- व्यक्तिमत्त्व मूल्यांकन : व्यक्तिमत्त्व मूल्यांकनाची तंत्रे व पद्धती, गुणतत्त्व पद्धती, प्रक्षेपण तंत्र, संश्लिष्ट पद्धती, व्यक्तिमत्त्व मूल्यांकनातील प्रगती
- मानसिक आरोग्य : मानसिक आरोग्य-अर्थ, वैफल्य, मानसिक आरोग्य रक्षणाचे उपाय, मानसिक आरोग्य रक्षणात कुटुंब व शाळा यांच्या जबाबदार्या व कर्तव्ये, मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्ती लक्षणे, शिक्षकाचे मानसिक आरोग्य
- समायोजन : समायोजन – अर्थ व व्याख्या, समायोजनाचे क्षेत्र, समायोजनाचे मापन, सुसमायोजित व्यक्तीची वैशिष्ट्ये, समायोजनाच्या उपपत्ती, समायोजनाच्या पद्धती