Prashant Publications

My Account

प्रसारमाध्यमे आणि मराठी

Authors: 

ISBN:

SKU: 9789390483594
Marathi Title: Prasarmadhyame Aani Marathi
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 328
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Prasarmadhyame-Aani-Marathi-by-Prof-Ujjwala-Bhor
Categories: ,

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

1990 नंतर आलेल्या ‘खाउजा’ धोरणामुळे परिवर्तन पावलेल्या परिस्थितीने ‘जग हीच एक बाजारपेठ’ बनली. काळ जसा झपाट्याने पुढे जाऊ लागला तसे जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये बदल जाणवू लागले. संगणक-इंटरनेटचे जाळे पसरले. गुगलवर माहितीचा साठा आला. दूरध्वनी ऐवजी मोबाईल आले. त्यांनी स्मार्ट रूप धारण केले. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर असे सोशल मीडियाचे एक जाळे पसरले. तंत्रज्ञान प्रगत, अद्ययावत झाले. पाहता पाहता या तंत्रज्ञानाने जगातील सर्व क्षेत्रावर पकड मजबूत केली. जग जवळ आणण्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरली ती नवतंत्रज्ञानाचे बळ लाभलेली प्रसारमाध्यमे. प्रसारमाध्यमांच्या स्वरूप व वापरात होत गेलेल्या या बदलाबरोबरच त्याद्वारे अभिव्यक्त व सादर होणार्‍या कार्यक्रमांतही बदल होत गेले. या बदलांना अनुसरून जनमनावर गारुड करणार्‍या या प्रसारमाध्यम क्षेत्रात मोठी उलाढाल होऊ लागली. रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी निर्माण झाल्या. स्वाभाविकच, त्याबाबतचे तंत्र व कौशल्ये शिकवण्याची गरज निर्माण झाली. तंत्र व कौशल्ययुक्त कारागिरीला नवकल्पनायुक्त सर्जनशीलतेची, भाषिक कौशल्याची जोड लाभली तर; प्रसारमाध्यमांच्या विस्ताराबरोबरच सांस्कृतिक जीवन संपन्न करणार्‍या उज्वल भविष्याचेही चित्र उभे राहू शकते…

Prasarmadhyame Aani Marathi

  1. प्रसारमाध्यमे आणि भाषा व्यवहार : 1.1 संकल्पना व स्वरूप, 1.2 प्रसारमाध्यमे : परंपरा व वाटचाल (विकास), 1.3 प्रसारमाध्यमांचे वर्गीकरण – प्रकार, 1.4 समाज माध्यमे (सोशल मिडिया), 1.5 विविध प्रसारमाध्यमांतील परस्पर संबंध, 1.6 प्रसारमाध्यमांचे स्वरूप व विशेष, 1.7 प्रसारमाध्यमातील आशय निर्मितीचे स्वरूप, वैशिष्टे व भाषा व्यवहार, 1.8 प्रसारमाध्यमांची जबाबदारी
  2. मुद्रित प्रसार माध्यमांसाठी लेखन : 2.1 मुद्रित प्रसारमाध्यमे : स्वरूप, विशेष, 2.2 मुद्रित माध्यमाची भाषा : स्वरूप-विशेष, 2.3 मुद्रित प्रसारमाध्यमांची वाटचाल : इतिहास, परंपरा, 2.4 मुद्रित प्रसारमाध्यमे आणि साहित्य व्यवहार, 2.5 वृत्तसंस्कृतीची संकल्पना, स्वरूप व कार्ये, 2.6 मुद्रित माध्यमातील लेखन प्रकार (लेखनबंध), 2.7 अहवालात्मक लेख (रिपोर्टाज), 2.8 प्रवासवर्णनपर लेख व लेखन, 2.9 विकास पत्रकारिता, 2.10 क्रीडा पत्रकारिता
  3. श्राव्य माध्यमासाठीचे (नभोवाणी) लेखन : 3.1 श्राव्य माध्यमाची (नभोवाणी) पार्श्वभूमी व इतिहास, 3.2 श्राव्य माध्यमाचे स्वरूप – विशेष, 3.3 श्राव्य माध्यमाचे सामर्थ्य, मर्यादा व महत्त्व, 3.4 आकाशवाणी कार्यक्रमांचे प्रकार व स्वरूप, 3.5 श्राव्य माध्यमासाठीचे लेखन : स्वरूप व भाषा
  4. दृक-श्राव्य माध्यमांसाठीचे लेखन : 4.1 दृक-श्राव्य माध्यम : पार्श्वभूमी व इतिहास, 4.1.1 दूरदर्शन आणि दूरचित्रवाणी : फरक, 4.1.2 खाजगी दूरचित्रवाणीच्या वाहिन्या, 4.1.3 प्रादेशिक वाहिन्या, 4.2 दृक-श्राव्य माध्यमाची उद्दिष्टे, 4.3 दृक-श्राव्य माध्यमाचे स्वरूप-विशेष, 4.4 दृक-श्राव्य माध्यमासाठीचे लेखन : तंत्र (लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी), 4.5 दृक-श्राव्य माध्यमासाठीचे लेखनप्रकार
  5. आस्वादलेखन : 5.1 कलेच्या व्याख्या व स्वरूप, 5.2 कलेची तत्त्वे व वर्गीकरण, 5.3 ललित कलांचे स्वरूप व वेगळेपण, 5.4 कला आणि स्वातंत्र्य, 5.5 विविध कला : परस्पर संबंध, 5.6 परिचयात्मक व परीक्षणात्मक लेखन, 5.7 विविध कलांचे आस्वादलेखन (कलानिहाय), 5.8 सर्जनात्मक आणि आस्वादात्मक लेखन
  6. परिचयात्मक व परीक्षणत्मक लेखन : 6.1 परिचयात्मक लेखन, 6.2 लेखक परिचय : स्वरूप, 6.3 परिचयपर लेखनाचे तंत्र/पूर्वतयारी, 6.4 लेखक परिचय किंवा आवश्यक बाबी (घटक), 6.5 लेखक परिचय – नमुना कवयित्री नीरजा, 6.6 युवांच्या जडणघडणीत कार्यरत असलेल्या व्यक्तींविषयी, परिचयात्मक स्वरूपाचे लेखन, 6.7 परिचय लेखन – नमुना : (‘धुमसत्या काश्मीरसाठीचे शांतीदूत’ – संजय नहार), 6.8 व्यक्तिपरिचय आणि व्यक्तिवेध, 6.9 ग्रंथ परीक्षण, परिशिष्टे : 1. रिपोर्टाज : ‘पक्षी जाय दिगंतरा’ – वर्षा गजेंद्रगडकर, 2. अग्रलेख – ‘जसे नसतो तसा’ (विशेष संपादकीय), 3. सदर – चित्रपटगीतांच्या शब्दांचे जादूगार! – राहुल गोखले, 4. मुलाखत : ‘हे टिकणार नाही’ – डॉ. वसंत आबाजी डहाके, 5. व्यक्तीवेध – प्रो. जॉन गुडइनफ, 6. सदर – ‘हास्य आणि भाष्य’ – प्रशांत कुलकर्णी, 7. नाट्य आस्वाद – ‘स्पर्धेत रंगत वाढवणारा ‘बांबूकाका..’ 8. चित्रपट आस्वाद – ‘मि. अँड मि. अय्यर’
RELATED PRODUCTS
You're viewing: प्रसारमाध्यमे आणि मराठी 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close