प्रहार कथासंग्रह
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
या कथासंग्रहात एकूण बारा कथा आहेत. सर्वच कथा या ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणार्या आहेत. समाजातील एका विशिष्ठ वर्गाकडून दीन, दलित, पिडीत वर्गावर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांचे दारिद्य्र, विषमता यावरे प्रकर्षाने उजेड टाकणारे आहे. या कथांमधील पात्रांच्या तोंडचे संवाद ग्रामीण बोलीतील असल्याने कथानकाला एकप्रकारे अस्सल ग्रामीण बाज आलेला आहे. श्री. प्रल्हाद खरे यांच्या कथेतील नायक हा क्रांतीकारी विचारांचा आहे. नव्या विचारांचा वाहक तसेच प्रसारक आहे. त्याला समतेची ज्योत घराघरात नेण्याची तळमळ आहे. समाजामध्ये नव परिवर्तन आणायचे असेल तर काही रुढी परंपरा यांचे भंजन करावे लागेल. यासाठी अशा गोष्टींवर प्रहार केला पाहिजे. तेव्हाच या जोखडातून खर्या अर्थाने मुक्त होता येईल. या गोष्टीची जाणीव लेखकाला आहे. वरील सर्वच कथांमधील नायक हे त्या दृष्टीने अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, रुढीपरंपरा यांवर प्रहार करणारे असेच आहेत. यादृष्टीने सदर कथासंग्रहाला दिलेले “प्रहार” हे नाव सार्थ ठरते. वाचक या कथासंग्रहाचे निश्चितच चांगले स्वागत करतील अशी आशा व्यक्त करतो.
– प्रा. किरण दशमुखे, सटाणा (नाशिक)
Prahar Kathasangrah
- ज्ञानसरिता
- हिसका
- क्रांतीदूत
- अंधारातले पक्षी प्रकाशमाला झाले
- पारुवर झालेल्या अत्याचाराची कहाणी
- आपल्या शिलारक्षणासाठी
- दिवाई आली
- प्रहार
- वृद्धापकाळातील एकांतवास
- माझा नातू
- बारटक्के सर
- स.दा. वाघमारे