भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1205 पर्यंत)
Indian History
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकीयांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्योत्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रियांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Bharatacha Itihas (Prambhpasun Te CE 1205 Paryant)
- प्राचीन भारतीय इतिहासाची साधने: 1) भौतिक साधने 2) वाङ्मयीन साधने – क) धर्मग्रंथ ख) इतर वाङ्मय ग) परदेशी प्रवाशांची प्रवासवृत्ते – ग्रीक लेखक; चिनी प्रवासी, 1) फाहियान 2) ह्यूएनत्संग 3) इत्सिंग
- सिंधू संस्कृती: कुठे आहे इतिहास?, हा घ्या पुरावा! (संस्कृतीचा शोध); संस्कृतीचा काळ – सर जॉन मार्शल, डॉ. सी. एल. फैब्री, ऋग्वेदाच्या आधारे, थरांच्या साहाय्याने, व्हीलरचे मत, सर्वसामान्य इतिहासकार; ताम्राश्मयुगीन संस्कृती – नागर संस्कृती; सिंधुपुत्र कोणत्या वंशाचे? – द्रविड, सुमेरियन, मिश्रजातीचे लोक; संशोधनातील अडचणी; नगर व गृहरचना, आर्थिक जीवन, धार्मिक जीवन, सांस्कृतिक प्रगती, सिंधु संस्कृतीच्या विनाशाची कारणे.
- पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ: अ) पूर्व वैदिक काळ किंवा ऋग्वेदकाळ – नव्या युगास प्रारंभ; आर्यांचे मूल निवासस्थान कोणते? आर्यांनी मूळस्थान सोडण्याचे कारण, आर्यांचा राज्यविस्तार, राजकीय व्यवस्था, आर्यांची आर्थिक परिस्थिती, धार्मिक-सामाजिक जीवन ब) उत्तर वैदिक काळ – उत्तर वैदिककालीन राजकीय परिस्थिती, नवीन राजसत्ता, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, धार्मिक जीवन, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती.
- धर्मक्रांतीचे युग (इ.स.पूर्व 6 वे शतक): धर्माच्या उदयाची कारणे – वैदिक धर्माची गहनता, जैनधर्म – भगवान पार्श्वनाथ, महावीरांचे जीवन, शिकवण, जैन वाङ्मय व स्थापत्य कला, जैनधर्म शांततेचा पुरस्कर्ता, बौद्ध धर्माचा प्रसार- सिद्धार्थाचे बालपण, धर्मचक्र प्रवर्तन, महापरिनिर्वाण; गौतमाची शिकवण, बौद्ध संघ, बौद्ध धर्माच्या धर्म परिषदा, बौद्धधर्माच्या प्रसाराची कारणे, बौद्धधर्माच्या र्हासाची कारणे, बौद्धधर्माचे भारतावर झालेले परिणाम, भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार.
- प्रादेशिक राज्यांचा उदय व ग्रीक/इराणी आक्रमणे: अ) प्रादेशिक राज्यांचा उदय – अवंती (माळवा), वत्स, कोसल, वृज्जी संघराज्य, मगध; बिंबिसार, वैशाली संघराज्याचा पराभव, नंद वंश ब) ग्रीक व इराणी आक्रमणे – सायरस, दरायस, झरसिस, इराणी आक्रमणाचे परिणाम, अलेक्झांडरचे पूर्वजीवन, झेलमची लढाई
- मौर्यकाल व मौर्योत्तर काल: मौर्यकाळाची माहिती देणारी साधने, चंद्रगुप्ताचे कुल; चंद्रगुप्ताचे जीवन, चाणक्याची भेट, चंद्रगुप्ताची राज्यव्यवस्था, चंद्रगुप्ताची योग्यता, सम्राट अशोक – राज्याभिषेक, कलिंगचे युद्ध, अशोकाची बौद्ध दीक्षा, अशोकाचा धर्मप्रसार, अशोकाचे आलेख, अशोकाची योग्यता, मौर्यसत्तेच्या विनाशाची कारणे, मौर्यकालीन समाजजीवन, धार्मिक जीवन, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक प्रगती ब) मौर्योत्तर काळ – 1) शुंग-कण्व काळ 2) कण्व घराणे 3) ग्रीक, शक व कुशाण आक्रमणे, कनिष्क 4) दक्षिणेतील पहिले साम्राज्य (सातवाहन) – कार्य, मौर्योत्तर कालाचे समालोचन
- गुप्त साम्राज्य (इ.स.320 ते 550): गुप्तसाम्राज्याचा संस्थापक श्रीगुप्त, घटोत्कच, पहिला चंद्रगुप्त; समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य), चंद्रगुप्ताची योग्यता; फाहियान, पहिला कुमारगुप्त, स्कंदगुप्त, गुप्त साम्राज्याच्या पतनाची कारणे, हूणांचे आक्रमण, हूण आक्रमणाचे भारतावर झालेले परिणाम, गुप्तकालाचे समालोचन.
- वाकाटक घराणे: वाकाटक घराणे – वाकाटकांचे मूलस्थान; वाकाटक घराण्यातील राजे, वाकाटकांची वत्सगुल्म शाखा, वाकाटककालीन प्रशासन व्यवस्था, साहित्य, कला व स्थापत्य, धार्मिक जीवन, वाकाटककालीन उद्योगधंदे.
- वर्धन साम्राज्य: वर्धन घराण्याचा पूर्वेतिहास-प्रभाकर वर्धन, राज्यवर्धन, सम्राट हर्षवर्धन, राज्यव्यवस्था, योग्यता, मृत्यू, ह्यूएनत्संग
- अरब आणि तुर्कांचे आक्रमण: अ) अरबांचे आक्रमण – सिंधची राजकीय स्थिती, अरबांच्या आक्रमणाची पाश्वर्र्भूमी, सिंधवर आक्रमण, महंमद इब्न कासीमचा मृत्यू, सिंधमधील हिंदूंचे शेवटचे राज्य, भारतात अरबी लोकांचे साम्राज्य वाढविण्याचा अयशस्वी प्रयत्न, अरबांच्या विजयाची कारणे, अरब आक्रमणाचे परिणाम ब) तुर्कांची आक्रमणे – गझनीचे राज्य, सबुक्तिगीन, महमंद गझनीची भारतावरील आक्रमणे, सोमनाथवरील स्वारी, महमूदच्या विजयाची कारणे, महमूदच्या आक्रमणाचा परिणाम, महंमदची योग्यता, महंमद घोरीच्या स्वार्यांचे उद्देश, महंमद घोरीची भारतावरील आक्रमणे, तुर्की स्वार्यांचे परिणाम.
- दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी: अ) बदामीचे चालुक्य वंश- राजे, चालुक्य घराण्याचे पतन, प्रशासन व्यवस्था, सामाजिक-आर्थिक जीवन, धार्मिक सहिष्णुता ब) राष्ट्रकूट घराणे- प्रशासन, महसूल व्यवस्था, लष्कर व्यवस्था, धार्मिक परिस्थिती क) पल्लव वंश – राजे, पल्लवांचे पतन; पल्लव काळाचे समालोचन, भारतीय संस्कृतीत पल्लवांचे योगदान ड) चोल घराणे – चोल राजे, प्रशासन व्यवस्था, चित्रकला, शिल्पकला, विद्या व साहित्य, सामाजिक व धार्मिक जीवन
- प्राचीन भारत – शिक्षण, स्त्री जीवन व न्यायपद्धती: अ) प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती व विद्यापीठे – शिक्षणाचा हेतू; गुरुकुल – अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती, प्राचीन भारतातील जैन शिक्षण पद्धती; शिक्षणाचा उद्देश, जैन शिक्षण, बौद्ध शिक्षण पद्धती, प्राचीन भारतातील काही विद्यापीठे – अ) तक्षशिला ब) नालंदा क) विक्रमशीला ड) वल्लभी इ) काशी ई) कांची च) मदुरा छ) अयोध्या ज) गुणशीला झ) कुंडीनपूर ब) प्राचीन भारतातील स्त्रीजीवन क) प्राचीन भारतातील कायदे व न्यायव्यवस्था