भारतीय लैंगिक शिक्षण
Indian Sex Education
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
21व्या शतकात लैंगिक शिक्षण मानवी जीवनासाठी अत्यावश्यक स्वरुपाचे शिक्षण आहे. समाजात असलेल्या अनेक गंभीर प्रश्नांपैकी एक असा हा प्रश्न असून समाजातील सामाजिक नियंत्रणे संयमपूर्वक, स्वास्थपूर्वक सर्वांकडून पाळली जावी यासाठीही लैंगिक शिक्षणाची देणे ही काळाची गरज आहे. सद्य:स्थितीत गतिमान आणि बदलती जीवनपद्धती यामुळे आईवडील आणि मुलांमधील संवाद कमी झाला आहे. शारीरिक बदलांची इत्थंभूत माहिती मुलामुलींना मिळाली नाही, तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. सामाजिक जीवनापासून दूर जाऊन त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढतो. वाढत्या वयानुसार मुलामुलींमध्ये होणार्या शारीरीक बदलांची माहिती त्यांना आवश्यक तेव्हा आणि वेळेत मिळाल्यास त्यांच्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत. त्यांच्यात आरोग्याची काळजी घेण्याची सवय निर्माण होऊन शारीरिक स्वास्थ्याबरोबर त्यांचे मानसिक व भावनिक स्वास्थ टिकून राहील. परिणामी सुदृढ समाजाची निर्मिती होईल.
मुलामुलींना लैंगिक शिक्षणाची जबाबदारी ही सर्वांची असून त्यात आई-वडील किंवा पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्था व सरकार यांचा देखील समावेश होतो. वैज्ञानिक आणि तांत्रिक युगामध्ये परंपरावादी, जुन्या बुरसटलेल्या विचारांना थारा देणे योग्य नाही. अल्पायुषी असलेल्या मानवी जीवनात आरोग्य स्वास्थासाठी योग्य वेळेस योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे.
Bharatiya Langik Shikshan
- लैंगिक शिक्षण
- लैंगिक अवयव विकास
- ऋतुस्त्राव (मासिकपाळी)
- मानसिक स्वास्थ
- कुटूंब नियोजन
- काम-शक्तीवर्धके
- लैंगिक अपमार्गण
- लैंगिक विकार
- सामाजिक समस्या