भाषिक कौशल्य विकास
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
भाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.
डॉ. पंडित विद्यासागर
माजी कुलगुरू
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड
Bhashik Kaushalya Vikas
- संगणक आणि मोबाईलवर युनिकोडमधून मराठी मुद्रण : 1.1 प्रास्ताविक, 1.2 युनिकोड म्हणजे काय?, 1.3 युनिकोडच्या वापराची आवश्यकता, 1.4 संगणकावर युनिकोडमधून मराठी मुद्रण, 1.5 मोबाईलवर युनिकोडमधून मराठी मुद्रण
- कळफलक प्रकार : इनस्क्रिप्ट, फोनेटिक : 2.1 कळफलक म्हणजे काय?, 2.2 इनस्क्रिप्ट कळफलक पद्धती, 2.3 मराठी इनस्क्रिप्ट की-बोर्ड, 2.4 मराठी इनस्क्रिप्ट की बोर्डचा वापर कसा करायचा?, 2.5 इनस्क्रिप्ट लेआऊटचा वापर करुन अल्पावधीत मराठी टंकलेखन शिकण्याची युक्ती, 2.6 फोनेटिक कळफलक पद्धती
- मराठी टंकलेखन आणि युनिकोडचा वापर : गुगल इनपुट, मायक्रोसॉफ्ट इनपुट व इतर साधने, 3.1 गुगल इनपुट, 3.2 मायक्रोसॉफ्ट इनपुट, 3.3 इतर साधने
- गुगल साधनांचा अध्ययनातील वापर : 4.1 गुगल फॉर्म, 4.2 गुगल क्लासरूम, 4.3 यु ट्यूब