वास्तु विज्ञान
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
पंचमहाभूतावर आधारित असलेल्या वास्तुशास्त्रात ब्रम्हकन्या ‘सरस्वती’ आणि सुपूत्र ‘विश्वकर्माचा’ सहभाग आहे. वास्तुशास्त्र सर्व समावेशक शास्त्र असून त्याच्या निर्मितीसाठी भौतिक नियमाबरोबरच आपल्या सभोवतालचा सूक्ष्म अध्यात्मिक शक्तीची जाण असणे आवश्यक असते.
भारतीय धर्मग्रंथामध्ये, वेद-उपनिषादमध्ये आणि पौराणिक सूक्तामध्ये वास्तूबद्दल उल्लेख आहे. कौटुंबिक जीवन जगताना नैसर्गिक सुख तसेच अधिकाधिक विश्रांतीच्या छायेसाठी संतुलीत घराची आवश्यकता असते.
बांधकाम साहित्याच्या भौतिक गुणाबरोबरच त्यांच्याशी संबंधित सर्व ऊर्जास्रोतांचाही विचार वास्तुशास्त्रात केला जातो. जीवनात सर्वोत्कृष्ट मार्गाचा अवलंब केला तर आपल्याला इच्छित स्थळी लवकरात लवकर सहज व सुरक्षित रित्या पोहचता येते. वास्तुशास्त्रात प्रतिकात्मकरित्या सूत्रांच्या रूपात विना अडथळ्यांचा मार्ग सूचविलेला असतो. सदरील ग्रंथात वास्तुशास्त्र, वास्तुकला इतिहास, वास्तुआकार, वास्तुनियोजन/नकाशा, वास्तु घटक, वास्तुनिर्मिती, प्रवेशद्वार, गृहप्रवेश, वास्तुदोष निवारण, वास्तु या सर्व घटकांचा परामर्श घेण्यात आलेला आहे.
Vastu Science
- वास्तुशास्त्र : वास्तु पुरुष, पिरॅमिड आवश्यकता
- वास्तुकला इतिहास : इजिप्शियन वास्तुकला, मेसोपोटेमियन वास्तुकला, ग्रीक वास्तुकला, रोमन वास्तुकला, ईसाई/ख्रिस्तो वास्तुकला, बायझांटिन वास्तुकला, रोमनेस्क वास्तुकला, गॉथिक वास्तुकला, प्रबोधनकालीन वास्तुकला, आधुनिक वास्तुकला, पौर्वात्य वास्तुकला, भारतीय वास्तुकला.
- वास्तुआकार : भूखंड आकार, चंद्रवेधी भूखंड, सूर्यवेधी भूखंड, वास्तु अन् स्वास्थ्य, जमीन परीक्षण, वास्तू आरंभ, वास्तूचा आकार, वास्तू सामग्री, वास्तूवृक्ष लागवड, निशिद्ध बाबी, प्रवेशद्वार, जलसाठा, खोल्यांची स्थिती, भूखंड आकार वास्तुफल.
- वास्तुनियोजन/नकाशा : वास्तु नकाशा, पूर्व दिशा, जल तत्व, अग्नि, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, ईशान्य दिशा, आग्नेय दिशा, नैऋत्य दिशा, वायव्य दिशा, पंचमहाभूते, पृथ्वी, वायु तत्व, आकाश तत्व, वास्तुग्रहासाठी रंगसंगती, नैसर्गिकरित्या वास्तुरचना.
- वास्तु घटक : वास्तुगृहाची अंगे आणि ग्रहसंबंध, बैठक खोली/हॉल, स्वयंपाकगृह, डायनिंग हॉल, बाथरूम, शौचालय, शयनकक्ष, पोर्च, देवघर, जिना, जलसाठा, सेप्टीक टँक, बाग-बगिचा, तळघर, आऊट हाऊस, अभ्यासिका, लावण्यगृह, व्हिजीटींग कार्ड्स, दगड/ पाषाण, पार्कींग, वास्तू व वैवाहिक जीवन, वास्तू आणि परस्पर संबंध, वास्तू आणि शनिग्रह.
- वास्तुनिर्मिती : बांधकाम, तळघर, भूखंडकोन वृद्धी / उणीव, भूखंडवेध.
- प्रवेशद्वार : गृहप्रवेशद्वार, प्रवेशद्वार, वास्तुसौंदर्य, द्वारवेध, मार्गवेध, कंपाऊंड गेट, प्रवेशद्वार व दिशा, वास्तुद्वार योजना.
- गृहप्रवेश : कालावधी, आशिर्वाद
- वास्तुदोष निवारण : वास्तुदोष, वास्तुपुरुष निक्षेप स्थान, वास्तुयंत्र, फेंगशुई, मुलतत्वे, मुलतत्वांचे विध्वंसक यंत्र, वास्तुदोष निवारण-मंगल चिन्हे.
- वास्तु : ठळक बाबी, वास्तुदोष निवारक यंत्र, व्यापारी संकुल, कारखाना, शेती, व्यावसायिक