विपणन : प्रणाली आणि व्यूहरचना
Marketing Process and Strategies
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
विपणन हे व्यवसायाचे एक कार्य आहे. प्रत्येक व्यवसायाला विपणन हे कार्य करावे लागते. विक्री आणि विपणन या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. उत्पादित वस्तू आणि सेवा अंतिम ग्राहक किंवा उपभोक्त्यापर्यंत पोहचविण्यासाठी अनेक व्यावसायिक कार्ये (खरेदी, एकत्रिकरण, वाहतूक, साठवण, जाहिरात व प्रसिध्दी, विक्री इ.) करावी लागतात; यांचा समावेश विपणनात केला जातो. औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यात यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन केले जाते. बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहक संख्येत होणारी वाढ या अनेक कारणांमुळे विपणनाची विविध कार्ये करावी लागतात. त्यामुळे विपणन संकल्पनेमध्ये बदल होत आहे. विपणन संकल्पनेचा उदय, पणन, विपणी अशा क्रमाने बदल झालेला दिसून येतो.
सदरील पुस्तकात विपणनाची ओळख, बाजारपेठ विभागीकरण आणि खरेदीदार वर्तन, विपणन मिश्र, वस्तु जीवन चक्र, विपणन रणनिती, सेवा विपणन आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारीत विपणन व्यूहरचनाची ओळख या घटकांवर सविस्तर चर्चा अत्यंत सोप्या शब्दात केलेली आहे.
Vipanan Pranali Ani Vyuvrachana
- विपणनाची ओळख : प्रस्तावना, विक्री व विपणन संकल्पना, विपणन आणि विक्री यातील फरक, विपणन – अर्थ व व्याख्या, विपणनाची ठळक वैशिष्ट्ये, विपणनाचे स्वरूप व व्याप्ती, विपणनाचे महत्व – व्यवसायाचे कार्य म्हणून, विपणन संकल्पना – (परंपरागत आणि आधुनिक), विपणन प्रक्रिया, विपणनाची कार्ये, विपणन नैतिक मूल्ये, ग्रीन मार्केटिंग, ग्रामीण विपणन
- बाजारपेठ प्रभागीकरण आणि खरेदीदाराची वर्तणूक : अ) बाजारपेठ प्रभागीकरण, अर्थ, व्याख्या, बाजारपेठ प्रभागीकरणाचे महत्त्व, उपभोक्ता बाजारपेठ प्रभागीकरणाचे आधारभूत घटक/तत्वे, बाजारपेठ विभागीकरणाचे फायदे व मर्यादा, ब) खरेदीदाराची (उपभोक्त्याची वर्तणूक), खरेदीदार वर्तन – अर्थ व व्याख्या, वैशिष्ट्ये, खरेदीदाराची वर्तणूक निश्चिती, उपभोक्त्याच्या (खरेदीदाराच्या) वर्तनावर परिणाम करणारे घटक, खरेदीदार/उपभोक्ता वर्तणुकीसंबंधी सिद्धांत, खरेदी निर्णय प्रक्रिया
- विपणन मिश्र : प्रस्तावना, विपणन मिश्र म्हणजे काय?, विपणन मिश्राचे घटक (7 झ’ी), अ) परंपरागत घटक (4 झ’ी), वस्तू, किंमत, स्थान व संवर्धन, ब) आधुनिक घटक (3 झ’ी), मनुष्यबळ, प्रक्रिया व भौतिक पुरावा, प्रभावी विपणन मिश्रचा विकास
- वस्तू जीवन चक्र – विपणन रणनिती : प्रस्तावना, वस्तू जीवन चक्र म्हणजे काय?, वस्तू जीवन चक्राच्या अवस्था, वस्तू जीवन चक्र – शैली, फॅशन व लहर, वस्तू जीवन चक्राच्या अवस्थेतील विपणन रणनिती
1) परिचय अवस्थासाठी विपणन रणनिती, 2) विकास अवस्थासाठी विपणन रणनिती, 3) परिपक्व अवस्थासाठी विपणन रणनिती, 4) समाप्ती अवस्थासाठी विपणन रणनिती - सेवांचे विपणन : प्रस्तावना, सेवा : व्याख्या व अर्थ, सेवांची उदाहरणे, वस्तू व सेवा यातील फरक, सेवांची वैशिष्ट्ये, सेवा विपणनाचे महत्त्व, सेवांचे वर्गीकरण किंवा प्रकार, सेवा विपणनातील समस्या
- माहिती तंत्रज्ञानाधारित मार्केटिंग व्यूहरचना : प्रस्तावना, कॉल टू अॅक्शन मार्केटिंग, क्लोज रेंज मार्केटिंग, क्लाउड मार्केटिंग, ड्रिप मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग, फ्रि-बाय मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, न्यूज लेटर मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मिडिया मार्केटिंग