Prashant Publications

My Account

विशेष शिक्षण

Special Education

Authors: 

ISBN:

SKU: 9789381546826
Marathi Title: Vishesh Shikshan
Book Language: Marathi
Edition: First

150.00

  • DESCRIPTION
  • INDEX

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शिक्षणाचे कार्य आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हे आजच्या शिक्षणक्षेत्राचे प्रमुख ध्येय मानले जाते. शिक्षण क्षेत्रात समाविष्ट होणार्‍या सामान्य, बुद्धिमान, सर्जनशील, स्त्रीया व अपंग, बालगुन्हेगार या सर्वांसाठी शिक्षण व्यवस्था आपआपल्या पद्धतीने कार्य करीत असते. प्रत्येकांच्या गरजा ओळखून, समस्या समजून शिक्षणाची उद्दिष्टे ठरविली जात असतात. ध्येय, उद्दिष्टे, गरजा व समस्या समजून अभ्यासक्रमाची रचना केली जाते. त्यानुसार शिक्षक आपल्या पद्धतीने अध्यापनाचे कार्य अध्ययनार्थ्यांच्या गतीने करीत असतात.

प्रस्तुत संदर्भ ग्रंथात प्रतिभावंत, सर्जनशील, मतिमंद, अध्ययन अकार्यक्षम, अस्थिव्यंग, कर्णबधीर, बालगुन्हेगार, दृष्टिदोष असलेल्या बालकांची ओळख कशी करावी? या बालकांच्या या समस्येमागील कारणे, त्यांची वैशिष्टे, त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या, त्यांच्यानुसार त्यांची शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत? तसेच त्यांच्यासाठी शैक्षणिक उपक्रम, शाळा, शिक्षक व पालकांची काय भूमिका असावी याबाबत विविधांगी चर्चा करण्यात आली आहे.

Vishesh Shikshan

  1. विशेष शिक्षणाचा अर्थ आणि व्याप्ती : विशेष शिक्षणाचा अर्थ, विशेष शिक्षणाचा संक्षिप्त इतिहास/प्रागतिक वाटचाल, विशेष शिक्षणाचे प्रवाह, भारतातील विशेष शिक्षणाची व्याप्ती
  2. दृष्टिहीन बालकांसाठी शिक्षण : नेत्र विकार दोष, दृष्टिदोषाची कारणे, दृष्टिदोष बालकांच्या समस्या, दृष्टिदोष असणार्‍या मुलांसाठी उपाय योजना, शैक्षणिक उपक्रम
  3. कर्णबधीर बालकांसाठी शिक्षण : श्रवणदोष/ कर्णबधिरत्वाचे वर्गीकरण, कर्णबधीर बालकांचे प्रकार, कर्णबधिरत्व असलेली बालके कशी ओळखावी?/ओळख, कर्णबधीरत्व असलेल्या बालकांची वैशिष्ट्ये, कर्णबधिरत्वाची / श्रवणदोषाची कारणे, कर्णबधीरत्व असलेल्या बालकांच्या समस्या, कर्णबधीर बालकांचे समायोजन, कर्णबधिरात्वासाठी उपचारात्मक साधने, कर्णबधीरत्वाला प्रतिबंध/ प्रतबंधात्मक उपाय, शैक्षणिक उपक्रम / कार्यक्रम, पालकांना मार्गदर्शन
  4. मतिमंद बालकांसाठी शिक्षण : मतिमंदत्व असलेली बालकांची वैशिष्ट्ये, मंदत्वाचे प्रमाण, मतिमंदत्व असलेली बालके कशी ओळखावी?, मतिमंदत्वाची कारणे, मतिमंदत्व असलेल्या बालकांच्या समस्या, मतिमंद बालकांचे शिक्षण
  5. प्रतिभाशाली व सृजनशील बालकांसाठी शिक्षण : प्रतिभाशाली बालकांची वैशिष्ट्ये, प्रतिभाशाली बालकांची ओळख, प्रतिभाशाली बालकांच्या समायोजनात येणार्‍या समस्या, प्रतिभाशाली बालकांचे शिक्षण, सर्जनशील बालके, सर्जनशील बालकांची वैशिष्ट्ये, सर्जनशील बालकांची ओळख, सर्जनशील बालकांसाठी शिक्षण
  6. अध्ययन अकार्यक्षम मुलांचे शिक्षण : प्रस्तावना, अध्ययन अकार्यक्षमता असलेल्या बालकांची वैशिष्टे/लक्षणे, अध्ययन अकार्यक्षमतेची कारणे, अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रकार, शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांची भूमिका
  7. बालगुन्हेगार : बाल गुन्हेगार कुणाला म्हणावे? (अर्थ), बालगुन्हेगारीचे प्रकार, बालगुन्हेगार बालकांचे वैशिष्ट्ये, बालगुन्हेगारांची ओळख, कारणे, उपचारात्मक साधने, बालगुन्हेगारीला प्रतिबंध, समाज आणि सरकारचे कर्तव्य
  8. शारीरिक विकलांग बालकांचे शिक्षण : अपंगत्व म्हणजे काय?, अपंगाचे प्रकार, अपंगासाठी असलेली सोय-सुविधा, शारिरिक अपंग, अपंग बालकांची ओळख, अपंग बालकांची वैशिष्ट्ये, अपंग बालकांची कारणामिंमासा, शारिरीक दृष्ट्या अपंग मुलांचे शिक्षण, उपचारात्मक साधने, शारीरिक अपंगत्व असलेल्या बालकांचे शिक्षण- प्रस्तावना, अपंगाचे प्रकार, लोकशिक्षण व लोकजागृती
RELATED PRODUCTS
You're viewing: विशेष शिक्षण 150.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close