सत्यशोधक आणि इतर कथा
Authors:
ISBN:
₹100.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रा. भरत शिरसाठ यांचे कथाविश्व समाज संस्कृतीच्या अंतरंगाचे सम्यक आकलन करुन त्यामधील कळीचे प्रश्न मांडू पाहते. जुनी दलित कथा, कविता एकाच जात वर्गाला ठोकत राहिली. पण हा नव्या जाणिवेचा कथाकार संपूर्ण जात व्यवस्थाच शत्रू मानून तिला संपविण्यासाठी ब्राह्मण्यरहित ब्राह्मणांचाही स्विकार करते.
मराठी कथाविश्वाला परिवर्तनवादी नवे सम्यक वळण देण्याची क्षमता प्रा. भरत शिरसाठ यांनी ‘सत्यशोधक आणि इतर कथा’ या कथासंग्रहाद्वारे सिद्ध केलीय. या कथेतील माणसं अस्सल आहेत. त्यांची जीवनशैली सत्वनिष्ठ व सत्यनिष्ठ आहे. बहुधार्मिक, सांस्कृतिक शुद्धता व एकात्मतेचा हा नवा कथाप्रयोग मराठी साहित्यात शिखरस्थ कला सौंदर्याचे उधळण करणारा आहे. कारण मानवाची समग्र क्षमता व सर्वांचे सर्वार्थाचे कल्याण दुःख मुक्त मानवतेच्या ध्येयवादातून लेखकाला अपेक्षित आहे. म्हणूनच भरत शिरसाठ जगावेगळा कथाकार आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा!
– डॉ. श्रीपाल सबनीस
Satyashodhak aani Itar Katha
- बानु
- लोटगाडी
- टिशू पेपर
- सत्यशोधक
- विना अनुदानित
- कोरोना आणि प्रेम
- व्हिक्टर
- समतेची प्रभा