समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना
Basic Concepts in Sociology
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
कोणत्याही भूप्रदेशावरील मानवांच्या परस्पर संबंधांची व्यवस्था किंवा पद्धती म्हणजे समाज होय. एकविसाव्या शतकाकडे झेपावणार्या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. मात्र या विकासाबरोबर सामाजिक विकासाचीही आवश्यकता भासली. समाजाच्या विकासाचा, सामाजिक संबंधांचा किंवा सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करणारे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा पाया घातला गेला. समाजशास्त्राच्या बाबतीत 18 वे शतक हे एक संस्मरणीय शतक म्हणून ओळखले जाते. सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संस्था, अर्थसंस्था, धर्मसंस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक नियंत्रण व सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रक्रिया मानली जाते. 1924 साली डॉ. गोविंद घुर्ये यांनी भारतातील आदिवासी समुदाय, जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, भारतीय रुढी, प्रथा व परंपरांचे सामाजिक कार्य अशा विविध विषयांवर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून संशोधन केले. आधुनिक काळात समाजशास्त्र हा विषय एक उपयोजनात्मक विषय व व्यावहारवादी विषय मानला जात असल्यामुळे या विषयाचे अध्ययन व संशोधन करणार्या अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदर पुस्तकात विविध मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
Samajshtratil Mulbhut Sankalpna
- समाजशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि विकास : 1.1 समाजशास्त्राचा उदय व विकास, 1.2 समाजशास्त्राचा अर्थ व स्वरूप, 1.3 समाजशास्त्राचा अभ्यासविषय किंवा व्याप्ती, 1.4 समाजशास्त्रीय अभ्यासाचे महत्व
- समाजशास्त्रातील मुलभूत संकल्पना : 2.1 मानवी समाज: अर्थ आणि वैशिष्ट्ये, 2.2 सामाजिक रचना: संरचनेचे घटक, 2.3 समाजव्यवस्था: अर्थ आणि वैशिष्ट्ये, 2.4 सामाजिक संस्था: अर्थ आणि वैशिष्ट्ये
- सामाजिक प्रक्रिया : 3.1 सामाजिक प्रक्रियेचा अर्थ, 3.2 सहकार्य, 3.3 स्पर्धा, 3.4 संघर्ष
- सामाजिक समूह : 4.1 सामाजिक गटाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, 4.2 सामाजिक गटांचे वर्गीकरण, 4.3 प्राथमिक आणि दुय्यम समुहाचा अर्थ व वैशिष्ट्ये, 4.4 संदर्भ समूह
- संस्कृती : 5.1 संस्कृतीचा अर्थ, 5.2 संस्कृतीची वैशिष्ट्ये, 5.3 संस्कृतीचे प्रकार, 5.4 संस्कृतीचे घटक, 5.5 सांस्कृतिक पश्चायन, 5.6 संस्कृतीचे स्वयंकेन्द्रीकरण
- सामाजिकरण : 6.1 सामाजिकरणाचा अर्थ व स्वरूप, 6.2 सामाजिकरणाचे उद्देश, 6.3 सामाजिकरणाची साधने, 6.4 पुर्नसामाजिकरण
- विवाहसंस्था : 7.1 विवाहसंस्थेचा अर्थ, 7.2 विवाहाचे प्रकार, 7.3 अंतर्विवाह आणि बहिर्विवाह, 7.4 अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह
- कुटुंब : 8.1 कुटुंबाचा अर्थ व वैशिष्ट्ये, 8.2 कुटुंबाची कार्ये, 8.3 कुटुंबाचे प्रकार
- धर्म : 9.1 धर्माचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, 9.2 धर्माची कार्ये, 9.3 धर्म आणि जादू, 9.4 धर्म आणि विज्ञान
- सामाजिक स्तरीकरण : 10.1 सामाजिक स्तरीकरणाचा अर्थ व वैशिष्ट्ये, 10.2 सामाजिक स्तरीकरणाचे आधार, 10.3 सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार, 10.4 सामाजिक गतिशीलता, 10.5 सामाजिक गतिशीलतेचे प्रकार
- सामाजिक नियंत्रण : 11.1 सामाजिक नियंत्रणाचा अर्थ, 11.2 सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता, 11.3 सामाजिक नियंत्रणाचे प्रकार, 11.4 सामाजिक नियंत्रणाची साधने, 11.5 सामाजिक अनुचलन आणि विचलन
- सामाजिक परिवर्तन : 12.1 सामाजिक परिवर्तनाचा अर्थ, 12.2 सामाजिक परिवर्तनाचे घटक, 12.3 सामाजिक परिवर्तनातील अडथळे