14 ऑक्टोबर 1956
(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला दिलेली धम्मदीक्षा-ऐतिहासिक संदर्भ)
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
डॉ. विशाखा कांबळे यांनी दोन दशकांपासून मराठी साहित्य आणि प्राचीन पुरातत्त्व विषयात स्वतंत्रपणे लौकिकता प्राप्त केली. त्यांनी मराठी वाङ्मयातील सर्वच प्रकारांना लेखणीच्या माध्यमातून अतिशय सक्षम व समर्थपणे स्पर्श केलेला आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्वाधिक उंचीचा वीरस्तंभाचा शोध लावून त्यावर संशोधन केले आहे. प्राचीन पुरातत्त्व व इतिहास विषयातही त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.
आजवर त्यांचे विविध प्रकारातील एकूण 21 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. या सर्वच ग्रंथात मानवीमूल्य आणि जीवनमूल्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन व चिंतन मांडलेले आहे. त्यांची संशोधनपर लेखन मिमांसा अभ्यासकांना विचारप्रवृत्त करण्यास भाग पाडते. मानववंश शास्त्राचे सर्व प्रमेय नव्या पद्धतीने मांडणार्या प्रतिभावंत संशोधक-लेखिका म्हणून साहित्य व पुरातत्त्व क्षेत्रात त्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटविली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्वरूपाचे एकूण 14 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील 47 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.
त्यांनी चित्रपट, मालिका, नाटक, महानाट्यातून विविध भूमिकाही साकारल्या आहेत. डॉ. कांबळे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या धनी आहेत.
14 October 1956