Prashant Publications

20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास

History of Maharashtra in the 20th Century (S-4)

Authors: 

ISBN:

SKU: 9789392425240

Rs.200.00

  • DESCRIPTION
  • INDEX

विसावे शतक हे रौद्र शतक मानले जाते. या शतकात दोन महायुद्धे होवून मानव किती क्रूर होवू शकतो हे जगाला दिसले. जगात मोठ्या प्रमाणात मानवी आणि भौतिक संपत्तीची हानी झाली. हिंदुस्थानात गर्व्हनर जनरल लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून येथे राष्ट्रवाद निर्माण केला. लाल, बाल आणि पाल यांची त्यांतून निर्मिती होवून स्वराज्याची मागणी होवू लागली. त्यानंतर गांधीयुग उदयाला आले. स्वातंत्र्याची पहाट घेवून आले. पण त्यावर फाळणीचे धुके पसरले. भाषावार प्रांताची भारतात मागणी झाली. त्यातून नवीन प्रांतांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा दुर्दैवाने द्वैभाषिक राज्य गुजरातच्या जोडीने निर्माण झाले. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना हे द्वैभाषिक मान्य नव्हते. त्यातून मुंबई कोणाची ही समस्या निर्माण झाली आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवून या राज्याने मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण साधले. त्यातून नागरीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. सहकाराच्या मार्गाने या राज्याची प्रगति झाली. साखर, कापूस या उत्पादनांनी यश गाठले. याचा प्रारंभीचा पाया महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी घातला. औद्योगिक प्रगतीमुळे कामगारांचे प्रश्न निर्माण झाले. ब्राह्मणेत्तर चळवळीबरोबर शेतकऱ्यांची चळवळ आणि दलित चळवळ ह्या चळवळी महाराष्ट्रात झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबादचा निजाम संघराज्यात सामील होत नव्हता. रझाकार चळवळीने त्याच्या राज्यात धुमाकूळ घातला. त्याला जमिनीवर आणण्याचे कार्य पोलिस कारवाईने केले. अशा अनेक घटनांचा आढावा या ग्रंथात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

20 vya Shatakatil Maharashtracha Itihas

  1. विचारवंत आणि त्यांचे कार्य : अ) पंडिता रमाबाई, ब) छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क) कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, ड) महर्षी धोंडो केशव कर्वे, इ) सयाजीराव गायकवाड, फ) डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, ग) कर्मवीर भाऊराव पाटील.
  2. महाराष्ट्राचा औद्योगिक आणि आर्थिक विकास : अ1) महाराष्ट्रातील औद्योगिकरण, अ2) महाराष्ट्रातील नागरीकरण, ब1) कापूस उद्योग, ब2) साखर उद्योग, क) सहकार चळवळ.
  3. महाराष्ट्रातील विसाव्या शतकातील चळवळी : अ) कामगार चळवळ, ब) शेतकरी आंदोलन, क) दलित चळवळ, ड) ब्राह्मणेतर चळवळ.
  4. एकात्मता आणि महाराष्ट्राची पुनर्रचना : अ) हैद्राबादचा मुक्ति संग्राम (मराठवाडा), ब) संयुक्त महाराष्ट्राची चळवळ.

Author

RELATED PRODUCTS
20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास
You're viewing: 20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास Rs.200.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close