आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय
Authors:
ISBN:
₹100.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक समाजमाध्यमेही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, युट्युब, व्हॉटस्अप, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम, ब्लॉग या आधुनिक समाजमाध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केले नाही तर या समाजमाध्यमांना अधिक विकसित व प्रगत बनवले. 24 तास चालणाऱ्या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांशिवाय आजच्या आधुनिक जीवनाचा विचारच करता येत नाही. म्हणून ही माध्यमे समजावून घेणे आणि त्यावर कसे अभिव्यक्त व्हावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र व कोणती पथ्ये पाळावयाची याची माहिती सदर पुस्तकातून प्राप्त होते. नवागतांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
1. आधुनिक समाजमाध्यमे : स्वरूप आणि परिचय
1.1. आधुनिक समाजमाध्यमे : स्वरूप आणि परिचय – 1.1.1. संकेतस्थळ 1.1.2. ई-मेल 1.1.3. ब्लॉग लेखन 1.1.4. फेसबुक 1.1.5. व्हॉटसॲप 1.1.6.एक्स (ट्विटर) 1.1.7 इंस्टाग्राम
1.2. आधुनिक समाजमाध्यमांचे कार्य, उपयुक्तता आणि ठळक वैशिष्ट्ये- 1.2.1. कार्य 1.2.2. उपयुक्तता 1.2.3. आधुनिक समाजमाध्यमांची वैशिष्ट्ये – अ) इलेक्ट्रॉनिक व स्वायत्तता
आ) माहिती तंत्रज्ञान इ) आभासी जगत ई) विश्वात्मकता
2. आधुनिक समाजमाध्यम : ई-मेल
2.1. ई-मेल म्हणजे काय?
2.1.1. ई-मेल खाते स्वरूप कसे असते?
2.1.2. ई-मेल खाते कसे उघडावे?
2.1.3. ई-मेलचा वापर कसा करावा?
3. आधुनिक समाजमाध्यमे : फेसबुक
3.1. फेसबुक – 3.1.1 फेसबुक खाते कसे तयार करावे?
3.2. फेसबुक लेखन स्वरुप
4. आधुनिक समाजमाध्यमे : युट्यूब व व्हॉटसॲप
4.1 युट्यूब स्वरूप, संकल्पना व निर्मिती : 4.1.1 युट्युबच्या सुविधा 4.1.2 युट्यूब चॅनल कसे तयार करावे? 4.1.3 युट्यूब चॅनलवर व्हिडिओ कसे पोस्ट करावे? 4.1.4 युट्युबची वैशिष्ट्ये 4.1.5 युट्यूब माध्यमावर अभिव्यक्ती
4.2 व्हॉटसॲप : 4.2.1. व्हॉटसॲप इन्स्टॉलेशन आणि स्वरूप
4.2.2. व्हॉटसॲप लेखन स्वरूप – अ) लिखित ब) दृक्-श्राव्य
क) स्टेटसवरील लिखाण.