Prashant Publications

My Account

आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र

Psychology of Happiness and Wellbeing

Authors: 

ISBN:

SKU: 9789348537287
Marathi Title: Ananad ani Niramay Swasthyache Manasshastra
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 88
Edition: First
Category:

120.00

  • DESCRIPTION
  • INDEX

शोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्‌‍” अर्थात ‌‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.
सर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‌‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‌‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे.

1. आनंदीवृत्ती – अर्थ व मापन 
(The Meaning and Measure of Happiness)
1.1 निरामय स्वास्थाचे मानसशास्त्र का? कशासाठी?
(Why a psychology of wellbeing)
1.2 आनंदीवृत्ती म्हणजे काय? दोन पंरपरा
(What is Happiness? Two Traditions)
1.3 व्यक्तिनिष्ठ खुशाली-इंद्रियजन्य/सुखवादी अनुभव आनंदीवृत्तीचा पाया
(Subjective well-being – The Hedonic basis of Happiness)
1.4 आत्मवास्तविकरणः आत्मिक आनंद आनंदीवृत्तीचा पाया
(Self Realization : The Eudaimonic Basis of Happiness)
1.5 आनंदाचे फायदे
(Benefits of Happiness)

2. आनंदीवृत्ती आणि जीवनातील वास्तवता 
(Happiness and the Facts of Life)
2.1 जीवनातील विविध टप्पे आणि आनंदीवृत्ती
(Happiness across the life span)
2.2 लिंगभेद आणि आनंदीवृत्ती
(Gender & Happiness)
2.3 विवाह आणि आनंदीवृत्ती
(Marriage & Happiness)
2.4 पैसा आणि आनंद
(Money & Happiness)
* संपन्नता विरोधाभास
(The Paradox up affluence)
2.5 जीवनातील इतर वास्तवता
(Other facts of life)

3. सकारात्मक भावना आणि निरामय स्वास्थ्य 
(Positive Emotion and Well being)
3.1 भावनेची व्याख्या आणि स्वरूप
(Definition and Nature of Emotion)
3.2 बार्बरा फ्रेडरिकसनची सकारात्मक भावनाविषयक ब्रॉडन ॲण्ड बिल्ड उपपत्ती
(Barbara Fredickson’s Broaden and Build theory of Positive Emotion)
3.3 सकारात्मक भावना आणि आरोग्य संसाधने
(Positive Emotion and Health Resources)
3.4 सकारात्मक भावना आणि निरामय स्वास्थ्य
(Positive Emotions and Well-being)
3.5 सकारात्मक भावना वृद्धिंगत करणारे अनुभव
(Cultivating Positive Emotion)
1) फ्लो अनुभव 2) सेव्हरिंग अनुभव

4. मनोसजगता (साक्षीभाव) आणि निरामय स्वास्थ्य 
(Mindfulness and Well-being)
4.1 मनोसजगता (साक्षीभाव) अर्थ
(Mindfulness meaning)
* मनोसजगता विरुद्ध मनोदुर्लक्षितता * मनोसजगता हे वर्तमानकेंद्रित अनुभवाच्या जागरुकतेची आणि अवधानाची स्थिती दर्शविते.
4.2 मनोसजगता ध्यान (साक्षीभाव ध्यान)
(Mindfulness Meditation)
4.3 मनोसजगतेचे फायदे
(Benefits of mindfulness)
4.4 मनोसजगता ध्यानाच्या इतर पद्धती
(Living with mindfulness)

5. भावनिक बुद्धिमत्ता 
(Emotional Intelligence)
5.1 भावनिक बुद्धिमत्ता
(Emotional Intelligence)
5.2 भावनिक बुद्धिमत्ता सिद्धांत
(Theories of Emotional Intelligence)
5.3 भावनिक बुद्धिमत्ता आणि आनंद
(Emotional Intelligence and Happiness)
5.4 भावनिक बुद्धिमान व्यक्ती जीवनात आनंद आणि सौख्य प्राप्तीसाठी अवलंबणारे मार्ग (Ways that EI. People choose for happiness)
5.5 भावनिक बुद्धि वृद्धिंगत करण्यात अंतर्भूत घटक
(Factors involved in Enhancing Emotional Intelligence)

6. कृतज्ञता आणि क्षमा 
(Gratitude and Forgiveness)
6.1 कृतज्ञता – व्याख्या व संकल्पना
(Gratitude : Defination and Concept)
* कृतज्ञता दर्शविणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये
6.2 कृतज्ञता आणि शारिरीक व मानसिक स्वास्थ्य
(Gratitude & Physical & Mental Health)
* कृतज्ञता आणि आनंदी वृत्ती
6.3 कृतज्ञता अभिव्यक्ती वृद्धीचे विविध मार्ग
(Ways of Practicing Gratitude)
6.4 क्षमा – अर्थ, व्याख्या व प्रकार
(Forgiveness : Meaning, Defination & Types)
* क्षमादान अंतनिरसन प्रोग्राम
6.5 क्षमाशीलतेचे लाभ/फायदे
(Benefits of Forgiveness)
* क्षमा ही आनंदाची गुरुकिल्ली आहे.

RELATED PRODUCTS
You're viewing: आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र 120.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close