गीतमाला आस्वाद व आकलन
Authors:
ISBN:
₹260.00
- DESCRIPTION
- INDEX
‘गीतमाला’ हे एकूण तीस गीतांचे संकलन असलेले पुस्तक असून, त्यात विविध प्रकारच्या गीतांचा समावेश करण्यात आला आहे. या संकलनात गीतांचा आस्वाद घेणे आणि त्यांचे सखोल आकलन करणे हे वाचकांसाठी अधिक सुकर व्हावे, यासाठी ‘गीतमाला : आस्वाद व आकलन’ या पूरक समीक्षा ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. या ग्रंथामध्ये प्रत्येक गीताच्या आशयाचा, रचनाशैलीचा आणि वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. गीतांच्या शब्दशैलीतून उमटणारे भावार्थ, त्यातील साहित्यिक सौंदर्य, छंदोबद्धता, संगीतात्मकता, तसेच गीतकाराच्या सौंदर्यदृष्टीचे विश्लेषण यात समाविष्ट करण्यात आले आहे. गीतांचा अभ्यास हा केवळ रसग्रहणापुरता मर्यादित न राहता, तो सखोल साहित्यिक दृष्टिकोनातून करण्यास मदत व्हावी, या हेतूने हा ग्रंथ रचण्यात आला आहे. गीतांचा सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ, त्या गीतांनी समाजमनावर उमटवलेली छाप यांचा मागोवा घेत या ग्रंथात विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘गीतमाला : आस्वाद व आकलन’ हा समीक्षा ग्रंथ वाचकांना गीतांचे रसग्रहण करण्याची तसेच त्यांची सौंदर्यस्थळे, आशयवैविध्य विकसित करण्याची दिशा दाखवतो. अभ्यासकांसाठी आणि संगीतप्रेमी वाचकांसाठी हा समीक्षा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
- प्रस्तावना- गीतः संकल्पना, स्वरूप व प्रकार – डॉ.अरुण कोळेकर
- जयोस्तुते श्रीमहन्मंगले – वि. दा. सावरकर
- मन सुद्ध तुझं – शांताराम आठवले
- जिथे सागरा धरणी मिळते – पी. सावळाराम
- जय जय महाराष्ट्र माझा – राजा बढे
- ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी – बाळ कोल्हटकर
- हीच आमुची प्रार्थना – समीर सामंत
- मी डोलकर दर्याचा राजा – शांता शेळके
- वंदन माणसाला – वामनदादा कर्डक
- माझी मैना गावावर राहिली – अण्णाभाऊ साठे
- या जन्मावर, या जगण्यावर – मंगेश पाडगावकर
- काळ्या मातीत मातीत – विठ्ठल वाघ
- फिटे अंधाराचे जाळे – सुधीर मोघे
- आकाशी झेप घे रे पाखरा – जगदीश खेबुडकर
- चिंब पावसानं रानं झालं – ना. धों. महानोर
- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी – सुरेश भट
- खरा तो एकची धर्म – साने गुरुजी
- वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे – इलाही जमादार
- आभाळाची आम्ही लेकरे – वसंत बापट
- शोधिसी मानवा, राउळी मंदिरी – वंदना विटणकर
- वाऱ्यावरती गंध पसरला – दासू वैद्य
- अधीर मन झाले – गजेंद्र अहिरे
- पड रे पाण्या, पड रे पाण्या – रघुनाथ वामन दिघे
- मी तर होईल चांदणी – भानुमती साबळे
- मी मोर्चा नेला नाही – संदीप खरे
- मैना उडून जाईन – प्रशांत मोरे
- झाले शहीद त्यांचे – बाबासाहेब सौदागर
- लई अवघड उमगाया बाप रं – गुरू ठाकूर
- मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा – अनंत राऊत
- लेक – हनुमंत चांदगुडे
- कायं सांगू राणी मला गाव सुटंना – गणेश आत्माराम शिंदे