Prashant Publications

खानदेशचा इतिहास

History of Khandesh

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040688
Category: Tag:
Category:

Rs.350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

आम्ही ज्या मातीत वाढलो, घडलो त्या मातीला उतराई होण्याच्या निमित्ताने खानदेशचा इतिहास लिहिण्याची कदाचित ही सुवर्णसंधी मला लाभली म्हणून कृतकृतार्थ वाटतेय किंबहुना ती जबाबदारी जाणीवपूर्वक मी घेतली. सदर अभ्यासक्रमाच्या पुस्तकात मानवी वसाहतपूर्व, ताम्रपाषाण वसाहतीपासून तर आजच्या सुवर्णनगरी जळगांव पर्यंत विविध कालखंडातील खानदेशचा इतिहास समाविष्ट केला आहे.
अभिमानाची गोष्ट म्हणजे प्राचीन काळी सम्राटांनी आपल्या मांडलिकांच्या मार्फत (निकुंभ, मौर्य, आभीर, गवळी), तर सुलतान काळात फारुकी सुलतानांनी, मुघलकाळात दख्खनच्या सुभेदारांनी, मराठाकाळात कमाविसदार-सरंजामदारांनी प्रशासन करत राज्यकारभार खानदेशात चालवला. त्यानंतर कंपनी व ब्रिटिश सरकारने राज्यकारभार केला.
या विविध कालखंडात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय प्रभावाची घुसळण (मिश्रण) खानदेशात फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. सातपुडा पर्वत ते सातमाळ्याची डोंगर रांग, तापी व तिच्या उपनद्यांचे खोरे(पांबोगिता-पांझरा, बोरी, गिरणा, तापी), कान नदी, कानबाईचा उत्सव, कान्हाचा जागर आणि अहिराणी लोकबोली इत्यादीने समृध्द प्रदेश म्हणजे खानदेश.
इथला भिल्ल, कोळी व तत्सम आदिवासी ते बारा बलुता-अठरा अलुता तसेच कुणबी-मराठा, गुजर, लेवा, राजपूत, माळी इ. कृषक जाती-जमाती, मुस्लिम व व्यापारी ज्ञातीसमूह या सगळ्यांच्या सहिष्णू, सर्वसमावेशक व सलोख्याचा, गर्वाने मन फुलावे असा हा उज्वल इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याचा आनंद काही औरच आहे.

सत्र पहिले

1. खानदेशाचे स्रोत 
(Sources of Khandesh)
प्रस्तावना
खानदेशाचे स्रोत
अ) पुरातत्व, शिलालेख, किल्ले, नाणी, मंदिरे
ब) अभिलेखागार
I) वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे,
II) समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे
III) गांधीतीर्थ संग्रहालय आणि पुराभिलेखगार, जळगाव
IV) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे
संग्रहालय आणि अभिलेखागार, जळगाव
V) वसाहतीकाळातील अहवाल
क) आत्मचरित्र, चरित्रे, वर्तमानपत्रे, जनगणना अहवाल
ड) मौखिक स्रोत

2. खानदेश : प्राचीन काळ 
(Khandesh : Ancient Period)
प्रस्तावना
अ) वसाहतपूर्व शेती आणि समाज
ब) राजवंश आणि राज्यव्यवस्था
क) कला आणि वास्तुकला
ड) व्यापार आणि वाणिज्य मार्ग

सत्र दुसरे

3. फारुकी आणि मुघलांच्या अंतर्गत मध्ययुगीन खानदेश 
(Medieval Khandesh Under the Faruqi & Mughals )
प्रस्तावना
अ) फारुकी आणि मुघल सम्राट
ब) शासन आणि प्रशासन
क) सामाजिक आणि आर्थिक स्थिती
ड) कला आणि वास्तूकला

4. मराठा साम्राज्याच्या काळात मध्ययुगीन खानदेश 
(Medieval Khandesh During the Maratha Empire)
प्रस्तावना
अ) छत्रपती शिवाजी महाराज (शिवकाळ)
ब) छत्रपती शाहू महाराज
क) पेशवाईचा काळ
ड) राजा आणि प्रशासन

5. वसाहतीअंतर्गत खानदेश 
(Khandesh under the Colonial Rule)
प्रस्तावना
अ) खानदेश वसाहतवादी राजवटीत
ब) खानदेशात 1857 चा उठाव
क) आदिवासी आणि शेतकरी चळवळी
ड) राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ – फैजपूर अधिवेशन (1936),
भारत छोडो आंदोलन 1942 (थोडक्यात), सशस्त्र संघर्ष

6. सामाजिक चळवळ आणि आधुनिकीकरण 
(Social Movement and Modernization)
प्रस्तावना
अ) सामाजिक चळवळी – सत्यशोधक व दलित चळवळ
ब) कृषी व औद्योगिक विकास
क) शैक्षणिक प्रगती
ड) सुवर्णनगरी म्हणून जळगावचा उदय

Author

RELATED PRODUCTS
खानदेशचा इतिहास
You're viewing: खानदेशचा इतिहास Rs.350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close