संप्रेषण कौशल्य आणि राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास
Communication Skills & Skill Development in Political Communication
Authors:
ISBN:
Rs.410.00
- DESCRIPTION
- INDEX
संप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित न झाल्याने किंवा योग्यरितीने राजकीय संप्रेषण न केल्याने राजकीय क्षेत्रात नुकसान झाल्याची उदाहरणे घडलेली आहेत. राजकीय क्षेत्र हे खूप प्रतिस्पर्धात्मक कटकारस्थानकारक, डावपेचात्मक, व्युव्हरचनात्मक झालेले आहे. प्रतिस्पर्धकाला किंवा विरोधाला संपविण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे गैरसमज, अफवा पसरविले जातात. विरोधकाची किंवा प्रतिस्पर्धकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी राजकीय संप्रेषण कौशल्याचा वापर केला जातो. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रभावी संप्रेषण कौशल्याचा वापर करणे आवश्यक असते. राजकीय संप्रेषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कल, अपेक्षा, अडीअडचणी, प्रश्न जसे समजतात तसाच त्यांचा विरोध किंवा समर्थन सुद्धा समजते. याशिवाय राजकीय प्रतिमा किंवा राजकीय ब्रॅन्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय संप्रेषण कौशल्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढले आहे.
यादृष्टीने संप्रेषण कौशल्य व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास या पुस्तकात अभ्यासपूर्ण उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित करण्याच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.
1. संप्रेषणाची संकल्पना
(Introduction)
1. संप्रेषण अभ्यासाचा इतिहास आणि उत्पत्ती
2. संप्रेषणाची वैशिष्ट्ये : द्विमार्गी प्रक्रिया, प्रेषक, संदेश, मध्यम, प्राप्तकर्ता
3. संप्रेषणाचे स्वरूप : शाब्दिक व अशाब्दिक संप्रेषण
4. संप्रेषणाचे पकार : परस्पर संप्रेषण, समूह संप्रेषण, जनसंचार आणि परस्परसंवादी संप्रेषण
5. संप्रेषणाचे मॉडेल (लॉस्वेल मॉडेल, शॅनन व विव्हर मॉडेल, आस्गुड व श्रॅम सर्कुलर मॉडेल
6. संप्रेषणातील अडथळे : सामाजिक सांस्कृतिक भाषिक आणि यांत्रिक अडथळे
7. संप्रेषण आणि समाज
2. साधने, संदेश निर्मिती आणि नैतिकतेची समस्या
(Introduction)
1. संप्रेषणाकरिता मिडिया : पारंपारिक मिडिया, मास मिडिया, सोशल मिडिया, डिजीटल मिडिया
2. प्रभावी संप्रेषकाची वैशिष्ट्ये, संप्रेषणातील नैतिकतेची समस्या
3. संदेश तयार करणे व लोकमत तयार करणे
4. कार्यशाळा व केस स्टडीत संप्रेषण संकल्पनेचा वापर
3. राजकीय संप्रेषण
(Introduction)
1. राजकीय संप्रेषणाचा परिचय आढावा
2. राजकीय संप्रेषणात मिडियाची भूमिका
3. राजकीय संप्रेषणात मिडियाचा प्रत्यक्ष वापर : प्रसिद्धीपत्रक प्रकाशित करणे, पत्रकार परिषद आयोजित करणे, टॉक शो व मिडिया मुलाखतीमध्ये भाग घेणे, प्रेस सोबत संबंध प्रस्थापित करणे, डिजिटल अभियान
4. राजकीय संप्रेषणात व्यावहारिक दृष्टीकोन
(Introduction)
1. राजकीय संप्रेषणासाठी आवश्यक कौशल्ये : बोलण्याचे कौशल्य, लेखन कौशल्य, मिडिया साक्षरता, रणनितिक विचार, संदेश निर्मितीचे व जनसंपर्काचे कौशल्य.
2. राजकारणी व्यक्तीची सोशल मिडियाशी प्रतिबद्धता
3. सोशल मिडिया वॉर रूम
4. राजकीय ब्रॅन्डींग व प्रतिमा बांधणी करणे
Author
Related products
व्यावहारिक मराठी
Rs.175.00Indian Economic Policy – I & II
Rs.250.00भारतीय शासन आणि राजकारण (खंड 1 & 2)
Rs.1,499.00पाश्चिमात्य राजकीय विचारवंत
Rs.495.00







