Welcome to Prashant Publications

Rs. 575.00
Availability: 10 left in stock

आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन व स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरूप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचे होते. परंतु आज...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आंतरराष्ट्रीय संबंध
- +

आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन व स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरूप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचे होते. परंतु आज राज्याचे परस्परांत राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय शब्दाचा वापर अठराव्या शतकाच्या शेवटी जेरेमी बेथंमद्वारा केला गेला होता.
आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपात वेगवेगळ्या कालखंडात परिवर्तन झालेले आहे. आज विज्ञानयुगात दळणवळणाच्या साधनांत झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे राज्याराज्यातील अंतर कमी झाले आहे. तद्वतच आज राष्ट्रांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांना परस्परांवर अवलंबून राहावे लागते. प्राचीन काळातील राज्ये स्वावलंबी होती. परंतु आज ती परस्परावलंबी बनली आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. प्रत्येक राष्ट्र, राज्य हे सार्वभौम आहे. प्रत्येक राज्यसंबंधांवर राष्ट्र आपले धोरण ठरविण्यास स्वतंत्र आहे. अशा स्वतंत्र, सार्वभौम व सत्तासंपन्न राज्यांच्या आपसांतील संबंधास आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतात. सार्वभौम राज्ये आपले हित साध्य करीत असतांना परस्परांशी संघर्ष करतात. या संघर्षात सत्तेचा अधिक उपयोग केला जातो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाला सार्वभौम राज्यांच्या परस्परातील क्रिया व प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते.
वर्तमानकाळात शीतयुद्धाची व्यापकता, टेक्नॉलॉजीचा विकास, वरील वादांचे निर्मूलन, तसेच नवीन राष्ट्रांचा उदय इत्यादी कारणांमुळे आंतरराष्ट्रीय अध्ययनाचे क्षेत्र अधिकच व्यापक झाले आहे.