Your cart is empty now.
भारतातील ‘क्षात्र वृत्ती’ हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. मौर्य, गुप्त, चौल अशा असंख्य राजवटींनी भारताबाहेरही आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहासात पदोपदी उल्लेख आढळतात. राजपूत, शीख, जाट, गोरखा मराठा, डोगरा, गढवाली व दक्षिणेतील नायर-कुर्ग, आग्नेय भारतातील नागा व मिझो जमाती शौर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. भारतीयांच्या एकतेअभावी परकियांना या देशावर राज्य निर्माण करणे शक्य झाले. समुद्रमार्गे आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या सागरी शक्तींकडे भारतीय राजांनी खूप दुर्लक्ष केले. अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांनी मोठ्या महत्प्रयासाने, दूरदृष्टिने उभारलेले मराठी आरमार पेशव्यांनी बुडविल्याने इंग्रजांना प्रतिकार करणारी सागरी सत्ताच उरली नाही. 1857 च्या सशस्त्र क्रांतीनंतर भारतातील कंपनी कारभाराला खीळ पोहचली. शिस्तबद्ध, आक्रमक, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा ब्रिटीशांनी स्थानिक लोकांचेच सैन्य उभारून भारतीय सत्तांचा पराभव करीत देशाला गुलामगिरीकडे ढकलले. 20 व्या शतकातील जागतिक महायुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी निर्णायक भूमिका बजावून आपले कर्तृत्व सिद्ध केले.
Aadhunik Bharatachi Lashakri Vyavsatha (1947 Paryant)