Your cart is empty now.
विपणन हे व्यवसायाचे एक कार्य आहे. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण यामुळे बाजारपेठ क्षेत्र आंतरराष्ट्रीय झाले आहे. बाजारपेठ क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. बाजारपेठेत सर्वत्र असंख्य ग्राहक विखुरलेले असतात. त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा सारख्या नसतात. खरेदीदाराची वर्तणूक एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. प्रमाणित वस्तू जीवन चक्रामध्ये प्रवर्तन, विकास, परिपक्व आणि समाप्ती अशा चार अवस्था आहे. नेटवर्क विपणनात काम करणारे सर्व व्यक्ती एक दुसऱ्यासोबत साखळीसारखे जोडलेले असतात. आज जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मानवी जिवनाच्या विविध क्षेत्रात केला जात आहे. बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या व नाना तऱ्हेच्या आकर्षक वस्तू येऊ लागल्यामुळे स्पर्धेचे स्वरूप तीव्र होऊ लागले. वस्तू आणि सेवेचे विपणन गतीमान करण्यासाठी माहितीचा देवाण-घेवाणासाठी परंपरागत माध्यमाचा वापर न करता आधुनिक माहिती तंत्रज्ञानावर आधारलेल्या सोशल मीडियाचा वापर करतात.
Andhunik Vipanan Tantre