Welcome to Prashant Publications

Rs. 0.00 10% OFF
Availability: 0 left in stock

डॉ. प्रकाश सपकाळे 'आवडीची तावडी' हा काव्यसंग्रह मराठी काव्य प्रांतातील एक अभिनव व आगळावेगळा प्रयोग आहे. प्रस्तुत संग्रह हा एखाद्या विशिष्ट बोलीवरील मराठीतील पहिलाच काव्यसंग्रह असावा. अर्थात समीक्षक डॉ. प्रकाश सपकाळे...

  • Name : आवडीची तावडी
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Manufacturing : December 2021
  • Total Pages : 62 Pages
  • Barcode : 9789393727886

Click here to be notified by email when this product becomes available.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आवडीची तावडी

डॉ. प्रकाश सपकाळे 'आवडीची तावडी' हा काव्यसंग्रह मराठी काव्य प्रांतातील एक अभिनव व आगळावेगळा प्रयोग आहे. प्रस्तुत संग्रह हा एखाद्या विशिष्ट बोलीवरील मराठीतील पहिलाच काव्यसंग्रह असावा. अर्थात समीक्षक डॉ. प्रकाश सपकाळे यांनी यापूर्वदिखील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यनिर्मितीप्रक्रियेवरील 'खोप्यामधी खोपा' ही खानदेशी बोलीतील कादंबरी लिहिली आहे. साहित्य अकादमीने त्यांचा 'बहिणाबाई चौधरी' हा मोनोग्राफ प्रसिद्ध केलेला आहे. त्यांचा 'माही माय बहिनाई' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. अलीकडे शैलीविज्ञान याविषयावर कुणी मंथन करताना दिसत नाही. प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे यांनी केलेली 'बहिणाईची गाणी : शैलीवैज्ञानिक समीक्षा' प्रसिद्ध आहे. सातत्याने भाषाविज्ञान या विषयावर ते लिहीत आले आहेत. त्यांचे भाषाविज्ञानावरील प्रभुत्व अभ्यासकांना नेहमीच प्रोत्साहित करीत आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा खानदेशी तावडी बोलीवरील कवितासंग्रह आमच्यासाठी मोठा मोलाचा ठेवा आहे. प्रस्तुत संग्रहातून पूर्वार्धात खानदेशी तावडी बोलीचा भूगोल, तिचे सामर्थ्य, तिची व्याकरणिक वैशिष्ट्ये येतात. उत्तरार्धदेखील अतिशय महत्त्वाचा आहे. यात त्यांनी लेवा गणबोली अशी स्वतंत्र बोली अस्तित्वातच नसून लेवा पाटीदारांनी राजपूत पाटील व मराठा पाटील यांच्याप्रमाणेच तावडपट्टीत स्थिरावल्यावर मूलनिवासींच्या खानदेशी बोलीचाच 'स्वीकार' केलेला आहे, असा सिद्धांत भाषावैज्ञानिक कसोट्यांवर साधार, ससंदर्भ मांडला आहे. 'बहिणाईची गाणी' याच खानदेशी बोलीत आहेत. 'खानदेशी बोली'चेच दुसरे नाव ती ताबडपट्टीतील असल्यामुळे 'तावडी बोली' असे आहे. अर्थात हे सर्व काव्यरूपात मांडले आहे म्हणूनच या संग्रहाचे दुहेरी मोल आहे.

-

💬

Chat with us