Welcome to Prashant Publications

Rs. 450.00
Availability: 10 left in stock

अंतर्गत व्यापारातील किरकोळ विक्री महत्त्वपूर्ण असा अविभाज्य घटक आहे. उपभोक्त्यांना हवी असलेली वस्तू किंवा सेवा त्यांच्या मागणीनुसार किरकोळ विक्रीद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. किरकोळ विक्रेता वस्तूंची विक्री लहान-लहान प्रमाणात करून...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

किरकोळ विक्री व्यवस्थापन सिद्धांत आणि प्रक्रिया
- +

अंतर्गत व्यापारातील किरकोळ विक्री महत्त्वपूर्ण असा अविभाज्य घटक आहे. उपभोक्त्यांना हवी असलेली वस्तू किंवा सेवा त्यांच्या मागणीनुसार किरकोळ विक्रीद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. किरकोळ विक्रेता वस्तूंची विक्री लहान-लहान प्रमाणात करून एक प्रकारे तुकडे किंवा छोटे भागच विक्री करीत असतो. किरकोळ विक्रेता घाऊक व्यापारी किंवा उत्पादक किंवा वितरक यांच्याकडून वस्तूंची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता यांना पाहिजे त्या प्रमाणात हवी असलेली वस्तू उपलब्ध करवून देत असतो. किरकोळ विक्रेता हा वस्तू वाटप साखळीतील घाऊक विक्रेता आणि अंतिम ग्राहक (उपभोक्ता) यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. किरकोळ विक्रेता हा एखादी कंपनी, अभिकर्ता किंवा संस्था स्वरूपात कार्यरत असू शकतो. सद्य:स्थितीत किरकोळ विक्री ही केवळ दुकानांद्वारेच केली जाते असे नव्हे, तर इंटरनेट, पोस्ट किंवा मार्केटिंगद्वारे केली जाते. वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचे बदलते व आधुनिक स्वरूप विचारात घेऊन सदरील पुस्तकात किरकोळ विक्री, विक्री व्यवस्था, विक्री पध्दती, विक्री व्यवस्थेचा आकृतीबंध, विक्रीचे अर्थशास्त्र, बाजारपेठेचे प्रभागीकरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन, उपभोक्ता वर्तणूक, विक्री विपणन मिश्र, मॉल व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाचा वापर तसेच आधुनिक विचारप्रवाहात ग्राहकानंद, ई-रिटेलिंग अशा विविध विषय व तंत्र याविषयी सविस्तर चर्चा केली आहे.