Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘कृषी-आधारित उद्योग’ हा विषय दोन- (2) क्रेडीटसाठी लेखी पेपर साठी हा विषय कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम म्हणून पदवी स्तरावर निश्चित करण्यात आला आहे. ‘कृषी आधारित उद्योग’ हे प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांच्या गरजा...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

कृषी आधारित उद्योग (भाग - २) (Agro-Based Industry-II)
- +

‘कृषी-आधारित उद्योग’ हा विषय दोन- (2) क्रेडीटसाठी लेखी पेपर साठी हा विषय कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम म्हणून पदवी स्तरावर निश्चित करण्यात आला आहे. ‘कृषी आधारित उद्योग’ हे प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांच्या गरजा आणि बदलत्या औद्योगिक धोरणांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाची विभागणी प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या भागांत केली आहे. पुस्तकातील प्रकरण-1 केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कृषी-उद्योजकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्यात PMEGP, मुद्रा योजना, Startup India आणि नाबार्ड यांची भूमिका सविस्तर मांडली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्या वित्तीय आणि तांत्रिक संस्थांची मदत घेता येईल. इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर पुस्तकाच्या प्रकरण- 2 मध्ये कृषी व्यवसायातील भविष्यकालीन संधी आणि आव्हानांचा वेध घेतला आहे. आजचे जग हे डिजिटल क्रांतीचे आहे, त्यामुळे e-NAM आणि ONDC सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा कृषी विपणनात होणारा वापर यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच, हवामान बदलाचे संकट लक्षात घेऊन ‘शाश्वत कृषी उद्योग’ कसा उभारावा, यावरही मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेषतः खान्देशातील यशस्वी कृषी-उद्योजकांच्या यशोगाथांचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संधींची प्रेरणा मिळेल. या संबधीची माहिती आहे.
तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे. हे पुस्तक केवळ परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त न ठरता, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास 
आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल एक नवीन दृष्टीकोन निर्माण करेल

प्रकरण 1........................................................................7
सरकारी सहाय्य आणि प्रोत्साहन
(Government Support and Incentives)
1.1 आर्थिक योजना
1.2 स्टार्टअप इंडिया आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग नोंदणी
1.3 मुद्रा योजना - लहान युनिट्ससाठी कर्ज
1.4 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम - उद्योजकता सहाय्य
1.5 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजना - अन्न प्रक्रिया
1.6 कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) - गोदाम, शीतगृह
1.7 सामुहिक प्रोत्साहन योजना -2019 अंतर्गत राज्यस्तरीय मदत
1.8 नाबार्ड, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाची, लहान शेतकरी कृषी-व्यवसाय संघ (SFAC) ची भूमिका
1.9 भांडवली गुंतवणूक, यंत्रसामग्री, वीज आणि बँक कर्ज व्याजावरील अनुदान
1.10 कृषी विज्ञान केंद्र (KVKs), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (ATMA), कृषी विद्यापीठांकडून तांत्रिक सहाय्य

प्रकरण 2.......................................................................84
भविष्यातील शक्यता आणि आव्हाने
(Future Prospects and Challenges)
2.1 कृषी व्यवसायातील उदयोन्मुख संधी
2.2 कृषी-आधारित उद्योगांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ई-मार्केटिंग (ONDC, eNAM) चा वापर
अनुक्रमणिका 2.3 हवामान बदलाचा सामना करू शकणारे कृषी-उद्योग विकसित करणे
2.4 कृषी-आधारित उद्योगांमध्ये नवोन्मेष आणि संशोधनाची भूमिका
2.5 कृषी-उद्योगांमध्ये मर्यादा आणि जोखीम व्यवस्थापन
2.6 खानदेशातील यशस्वी कृषी-उद्योजकांचे केस स्टडी

संदर्भ ग्रंथसूची .............................................................150

💬

Chat with us