Your cart is empty now.
ऐसा चाहूं राज मैं, जहाँ मिलै सबन कौं अन्न |
छोट-बड़ो सभ सम बसे, ‘रविदास’ रहैं प्रसन्न ॥
गुरु रविदासांनी मानवी मूल्यांची, समानतेची आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेची जोपासना करणारा वैचारिक लढा दिला. प्रचंड प्रतिभा, प्रभावी वाणी, संघटन कौशल्य, सामान्य जनतेविषयी आस्था, श्रद्धा, प्रेम, करुणा, बंधुत्व असे अष्टपैलू व्यक्तीमत्व गुरु रविदासांचे होते. त्यांच्या तत्त्वज्ञानात आधुनिक काळातील उपयुक्त मुल्ये दिसून येतात. जसे की, कोणताही व्यक्ती त्याच्या जन्मामुळे लहान किंवा मोठा होत नाही तर त्याच्या कर्मामुळे होतो. एखाद्या व्यक्तीची कृती त्याला उच्च किंवा नीच बनवते. जर तुमचे मन आणि अंतःकरण शुद्ध असेल तर ईश्वर तुमच्या हृदयात वास करतो. सर्व मानव हे समान आहेत. मानवसेवा हिच खरी ईश्वरसेवा असून सत्याचा आग्रह धरला पाहिजे. जो माणूस सत्य बोलत नाही आणि जो विश्वासघात करतो त्याच्याबरोबर कोणताही व्यवहार ठेऊ नये. जोपर्यंत ही जात संपणार नाही, तोपर्यंत माणूस माणसाशी जोडला जाऊ शकत नाही. संपूर्ण सजीव सृष्टीसुद्धा एकाच घटकापासून (मातीपासून) बनलेली आहे व त्यांना बनवणाराही एकच असल्याने आपापसातील भेदभाव नष्ट केले पाहिजेत. जगात सर्वत्र अशी समाजव्यवस्था हवी की, सर्वांना पोटभर अन्न खायला मिळेल. जिथे लहान-मोठे, दीन-दलित, गरिब-श्रीमंत असा कुठलाही भेद असणार नाही. गुरु रविदासांनी चौदाव्या शतकात मांडलेले विचार आजही उपयुक्त व विचार करायला लावणारे आहेत. म्हणूनच गुरु रविदासांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रस्तुत ग्रंथलेखनाचा प्रपंच…
Guru Ravidas Jeevan ani Karya