Your cart is empty now.
‘घरवावर’ना हाऊ बहर फक्त महाराष्ट्रनी मातीम्हा दरवळी आसं नहीसे, तर आहिरानी भाषाना मानूस जगम्हा जठे कोठे व्हई तठे-तठे हाऊ आस्सल मातीना सुगंध दरवळनार से. कवी/साहित्यिक आनी आहिरानी भाषाना सेवक कार्यकर्ता म्हनीसन मी प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी यास्नाकडे देखस. सुर्यवंशी सुर्यना वंशज शेतस तं जगभर उजेड पडीन ना!
गाव शिवनी कथा सांगस सदाभाऊ
घर वावरनं दु:ख मांडस सदाभाऊ
कवी सदाशिव सुर्यवंशी येस्ले कवितास्नं पूर्न भान से. त्यास्ना जगाम्हाच एक न्यारी धून से, तिले लय से, ताल से आनी पक्का सूर से. कवितास्ना विविधांगी प्रकारले त्यास्नी असा काही तऱ्हे बांधेल से जसा पैठनीना कसदार कलावंत पैठनीमा आपली कला उतरावस आसं वाटत ऱ्हास की, त्या पैठनीमधला मोर आपला घरना ओटावरच नाची ऱ्हायनात. कवी.सदाशिव सुर्यवंशी यास्नी ‘घर वावरनी’ हायी कविता काळीजमा नाचस आनी डोयामा साचस. मना लाडका धाकला भाऊ सदाले काळीजभर शुभेच्छा देस आनी संपूर्न संस्कृतीना पट लिखाबद्दल विनम्र सलाम करस!
– लोककवी प्रशांत मोरे
मुंबई
Ghar Vavar