Your cart is empty now.
21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीची अनेकतम उत्तुंग शिखरे पादाक्रांत केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची शक्ती निश्चितच लक्षात घ्यावी लागते त्याचबरोबर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सरकारी, विविध व्यावसायिक क्षेत्र, विविध सामाजिक संघटना इत्यादींना कार्यप्रवण करण्यामागे सामाजिक नवकल्पनांची भूमिका देखील समजून घ्यावी लागते. सामाजिक उद्योजकता ही सामाजिक नव्या कल्पनांना बळ देणारी, सामाजिक समस्यांचे निराकरण करणारी समाज उपयोगी प्रक्रिया म्हणून निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत स्टार्ट अप या संकल्पेचा उदय झालेला असून साधारणत: नवीन कल्पनेवर आधारित कोणताही व्यवसाय कल्पनेची निर्मिती केली जाते. नागरी शिक्षणातून सक्रीय सहभाग घेणारे, राजकीय व सामजिक जाणीव-जागृती असणारे आणि लोकशाही व्यवस्थांना बळकटी देणारे नागरीक घडवीता येत असल्याने, नागरी शिक्षणाचे महत्व अत्यावश्यक ठरते. माहिती तंत्रज्ञान युगात दैनंदिन कामासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल, इंटरनेट यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्यापक लोकसंख्येमुळे दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण, अनारोग्य, अस्वच्छता, निवार्याची व्यवस्था नसणे अशा कितीतरी समस्या निर्माण झाल्या आहेत. ही सद्य:स्थिती नवभारताची वास्तविक ओळख आहे.