Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

डिजिटल युगाला आजच्या जीवनात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वी पत्राद्वारे संदेश पाठवल्यास तो पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागत असत. आता मात्र मोबाईल, ई-मेल, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या...

  • Name : डिजिटल युग आणि राजकीय परिवर्तन (भाग-1) - The Digital Age and Political Transformation (Part-1)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - V | Political Science
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 80 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

डिजिटल युग आणि राजकीय परिवर्तन (भाग-1) - The Digital Age and Political Transformation (Part-1)
- +

डिजिटल युगाला आजच्या जीवनात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वी पत्राद्वारे संदेश पाठवल्यास तो पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागत असत. आता मात्र मोबाईल, ई-मेल, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही भागातील व्यक्तीशी काही क्षणांत संपर्क साधता येत. त्यामुळे अंतर कमी झाले असून व्यक्ती, संस्था तसेच देश यांच्यातील संवाद अधिक वेगवान झाला आहे. शिक्षण क्षेत्रातही डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ऑनलाइन शिक्षण, ई-पुस्तके, आभासी वर्ग आणि शैक्षणिक संकेतस्थळांमुळे शिकण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. आर्थिक क्षेत्रात डिजिटल युगामुळे मोठे बदल झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग, UPI, डिजिटल पेमेंट आणि ई-कॉमर्स यांमुळे आर्थिक व्यवहार करणे सोपे आणि जलद झाले आहे. मोबाईलच्या माध्यमातून पैसे पाठवणे, बिले भरणे, तिकिटे बुक करणे किंवा विविध सेवा घेणे शक्य झाले आहे. आरोग्य क्षेत्रातही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शेती क्षेत्रातही डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बाजारभाव, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती मोबाईलच्या माध्यमातून मिळू शकते. योग्य माहिती योग्य वेळी मिळाल्यास शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यास आणि बाजारपेठेबाबत निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान हे केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण विकासासाठीही उपयुक्त ठरत आहे. 
प्रशासनाच्या क्षेत्रात ई-गव्हर्नन्समुळे सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध होऊ लागल्या आहेत. राजकीय क्षेत्रात पण डिजिटल युगाचा मोठा प्रभाव पडला आहे. मात्र डिजिटल युगाचे काही नकारात्मक परिणामही आहेत. तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर झाल्यास प्रत्यक्ष मानवी संवाद कमी होऊ शकतो. मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन, चुकीची माहिती, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. त्यामुळे डिजिटल साधनांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास ते उपयुक्त ठरते; परंतु त्याचा निष्काळजीपणे वापर केल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळेच या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक झाले आहे. काळाची गरज ओळखून हा विषय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने यु.जी.च्या विद्यार्थ्यांसाठी निवडला. 

प्रकरण 1........................................................................7
डिजिटल युग
Digital Age
1.1 डिजिटल युगाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये
अ) डिजिटल युगाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये
ब) डिजिटल युगाची प्रमुख वैशिट्ये आणि भारतीय राजकारण
1.2 माहिती समाज आणि नेटवर्क समाज
नेटवर्क समाज, माहिती समाज आणि नेटवर्क समाजः परस्परसंबंध,
डिजिटल युगाचे महत्त्व
1.3 डिजिटल दरी ः उपलब्धता, असमानता आणि वगळले जाणे
1.4 अ) तंत्रज्ञान आणि राजकीय बदल
ब) लोकशाही संस्थांवर डिजिटलायझेशनचा प्रभाव

प्रकरण 2.......................................................................33
डिजिटल लोकशाही
Digital Democracy
2.1 डिजिटल लोकशाही : संकल्पना, स्वरुप आणि महत्त्व
2.2 डिजिटल लोकशाही आणि नागरिकांचा सहभाग
2.3 ऑनलाइन राजकीय सहभाग: ई-निवेदने डिजिटल मोहिमा,
ऑनलाइन सक्रियता
2.4 राजकारणातील सोशल मीडियाची भूमिका
राजकीय संवादाचे साधन : फेसबुक आणि व्हाट्सॲप

प्रकरण 3.......................................................................50
डिजिटल चळवळी
Digital Movements
3.1 डिजिटल राजकीय चळवळ अर्थ आणि उद्देश
डिजिटल राजकीय चळवळींची वैशिष्ट्ये
3.2 डिजिटल निदर्शने आणि नेटवर्क-आधिरित चळवळी
3.3 युवा, तंत्रज्ञान आणि राजकीय सहभाग
3.4 डिजिटल बदलाचे सात स्तंभ
3.5 अभ्यास-विषय (केस स्टडी)
अरब स्प्रिंग : नेटवर्क आधारित चळवळ
3.6 डिजिटल इंडिया कार्यक्रम, 2015
ऐतिहासिक पार्श्वभूमी, डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे नऊ स्तंभ

संदर्भ ग्रंथ......................................................................76

💬

Chat with us