Your cart is empty now.
प्राचीन काळी भारतवर्षात ब्रह्मयज्ञात बालकांना, शिष्यांना शिक्षण देण्याची परंपरा होती. तेथील विविध प्रकारच्या गहन संशोधनातून, लेखनातून, तत्त्वमय आचरणातून, गहन चिंतन-मननातून विविध बालकांचे रूपांतर प्रज्ञावंतांत झाले. आपल्या मुलांना/मुलींना विविध प्रज्ञावंताची ओळख झाली तर ते योग्य मार्ग पत्करू शकतील. आपल्या पाल्याला खेळ, संगीत, नाटक, कथा इत्यादी सर्वांची कला अवगत होणे आवश्यक आहे. लहान बालकांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अतिजागरूकतेने, संवेदनशीलतेने त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान देण्याकडे कटाक्ष ठेवावा. लहान बालके हीच भारतवर्षाची भविष्यकालीन संपत्ती असून, बालकांची क्षमता असतानादेखील त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवणे चुकीचेच ठरते. बुद्धीमत्ता, अंतर्गत आवडी-निवडीच्या नैसर्गिक सृष्टीतील बालके मौल्यवान रत्ने आहेत. बुद्धी नैसर्गिक दैवी शक्ती असली तरी तिचे सामर्थ्य, क्षमता वाढविणे पालकांच्या, गुरुजनांच्याच हातात असते. बुद्धी आणि ज्ञानसंपन्नता प्रगल्भतेचे लक्षण आहे. लहान बालकांना प्रज्ञावंतांची ओळख लहान वयातच व्हावी, त्यांनी विविध गुणांचे जोपासून त्यात वाढ करावी, याच निरामय हेतूसाठी सदरील ग्रंथलेखनाचे प्रयोजन.
Tejaswi Pradnyawant