Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या T.Y.B.A. च्या NEP च्या अभ्यासक्रमानुसार ‘निवडणूक व्यवस्थापन’ या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडणुका या केवळ सत्तांतराचे साधन नसून त्या लोकांच्या सार्वभौम इच्छेचे प्रकटीकरण...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

निवडणूक व्यवस्थापन - Election Management
- +

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या T.Y.B.A. च्या NEP च्या अभ्यासक्रमानुसार ‘निवडणूक व्यवस्थापन’ या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडणुका या केवळ सत्तांतराचे साधन नसून त्या लोकांच्या सार्वभौम इच्छेचे प्रकटीकरण करणारी एक मूलभूत प्रक्रिया आहेत. भारतासारख्या विशाल, विविधतेने नटलेल्या देशात निवडणूक व्यवस्थापन ही अत्यंत गुंतागुंतीची, बहुआयामी आणि शास्त्रीय दृष्टिकोनाची मागणी करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचे सखोल आकलन, तिच्या कायदेशीर चौकटीची जाण, तसेच तळागाळातील अंमलबजावणीची समज असणे अत्यावश्यक ठरते. 
प्रस्तुत पुस्तकामध्ये निवडणूक व्यवस्थापनाचे विविध पैलू व्यापक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निवडणूक चौकट आणि कायदेशीर रचना यापासून सुरुवात करून, निवडणूक प्रचार व्यवस्थापनातील ग्राउंड सर्वेक्षण, राजकीय गुप्तचर, डेटा विश्लेषण आणि सोशल मीडिया रणनीती यासारखी आधुनिक तंत्रे यांचा सखोल अभ्यास या ग्रंथात केला आहे. तसेच निवडणुकांमधील संशोधन पद्धती आणि राजकीय विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून निवडणूकीतील स्पर्धात्मक अभ्यास कसा करावा, विरोधकांचे विश्लेषण कसे करावे यावरही विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः, बूथ व्यवस्थापन हा निवडणूक विजयाचा कणा मानला जातो. त्यामुळे बूथ व्यवस्थापनाची संकल्पना, त्याचे महत्त्व, रचना, समितीची स्थापना आणि भूमिका यांचे सविस्तर विवेचन या पुस्तकात केले आहे. याशिवाय, बूथ स्तरावरील सर्वेक्षण, स्थानिक प्रश्न व मुद्द्यांची ओळख, तसेच मतदानाच्या दिवशीचे सूक्ष्म नियोजन आणि समन्वय या बाबींवरही व्यावहारिक मार्गदर्शन देण्यात आले आहे. हे पुस्तक केवळ निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी, संशोधकांसाठी आणि धोरणकर्त्यांसाठीही उपयुक्त ठरेल, असा माझा विश्वास आहे.

प्रकरण 1........................................................................7
निवडणूक व्यवस्थापन
Election Management
निवडणूक चौकट आणि कायदेशीर रचना
निवडणूक प्रचार व्यवस्थापन - ग्राउंड सर्वेक्षण, राजकीय गुप्तचर, डेटा विश्लेषण आणि सोशल मीडिया रणनीती
निवडणुकांमधील संशोधन पद्धती
राजकीय विश्लेषण आणि स्पर्धात्मक अभ्यास - निवडणूक डेटा विश्लेषण, विरोधकाचे संशोधन

प्रकरण 2.....................................................................158
बूथ व्यवस्थापन
Booth Management
बूथ व्यवस्थापनाची रचना, उद्देश आणि महत्त्व
बूथ व्यवस्थापन समितीची रचना
बूथ स्तरावरील सर्वेक्षण आणि प्रश्न, मुद्दे, समस्यांची ओळख
मतदानाच्या दिवशीचे व्यवस्थापन आणि बूथ समन्वय

संदर्भ ग्रंथसूची...............................................................253

💬

Chat with us