Your cart is empty now.
प्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात स्थानिक स्वराज्य संस्थेचा अर्थ, स्वरूप, इतिहास आणि केंद्र व राज्य सरकारने स्थापन केलेल्या विविध समिती आणि ७३ व्या घटनादुरुस्तीबद्दल माहिती दिलेली आहे. दुसऱ्या प्रकरणात ग्रामीण प्रशासनातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत संस्था रचना, कार्य आणि अधिकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तिसऱ्या प्रकरणात ग्रामीण स्थानिक प्रशासनातील राजकीय आणि प्रशासकीय पदाधिकाऱ्यांविषयी सविस्तर विश्लेषण केलेले आहे. चौथ्या प्रकरणात समकालीन ग्रामीण समस्या आणि सुधारणा कार्यक्रमासंदर्भात वर्णन केलेले आहे.
पाचव्या प्रकरणात नागरी संस्था ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वरूप आणि कार्यांदर्भात माहिती दिलेली आहे. सहाव्या प्रकरणात नागरी संस्थांच्या संरचनेबाबत चर्चा केलेली आहे. सातव्या प्रकरणात नागरी संस्थेतील राजकीय आणि प्रशासकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे विवेचन केलेले आहे. अंतिम आणि आठव्या प्रकरणात समकालीन नागरी समस्या, आव्हाने आणि शासकीय उपाययोजनेची माहिती दिलेली आहे.
प्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थी वर्गास पंचायतराज आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय समजण्यास हातभार लागेल, तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था या विषयावर तज्ज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथाचा आधार घेतलेला आहे.