Welcome to Prashant Publications

Rs. 170.00 10% OFF
Availability: 10 left in stock

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमासाठी (VSC) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय वर्ष कला (टी.वाय.बी.ए.) या वर्गासाठी लागू केलेल्या अभ्यासक्रमानुसार ‘पर्यटन भूगोलाची ओळख...

  • Name : पर्यटन भूगोलाची ओळख आणि सहल नियोजनाची प्रात्यक्षिके Introduction to Tourism Geography & Practicals in Tour Planning
  • Vendor : Prashant Publication
  • Type : T.Y.B.A. SEM V-VI
  • Manufacturing : July 2026
  • Total Pages : 120 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यटन भूगोलाची ओळख आणि सहल नियोजनाची प्रात्यक्षिके Introduction to Tourism Geography & Practicals in Tour Planning
- +

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमासाठी (VSC) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय वर्ष कला (टी.वाय.बी.ए.) या वर्गासाठी लागू केलेल्या अभ्यासक्रमानुसार ‘पर्यटन भूगोलाची ओळख व सहल नियोजनाची प्रात्यक्षिके’ हे पुस्तक लिहिण्यात आले असून ते विद्यार्थी आणि प्राध्यापक बंधू भगिनींच्या हाती सुपूर्त करतांना आम्हास अतिशय आनंद होत आहे. अलीकडील काळात बहुतेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा वाढला असून आज पर्यटन ही जागतिक स्तरावरील एक महत्त्वाची आर्थिक क्रिया बनली आहे. ही बाब विचारात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यासमंडळाने या विषयाचा पदवी स्तरावरावरील अभ्यासक्रमात समावेश केला आहे. 
भूगोल विषयाच्या विद्यार्थांना पर्यटन क्षेत्रातील भूगोलाचे महत्त्व समजून देण्याच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक, व्यावसायिक, संशोधक यांच्याशी सखोल चर्चा करून तसेच पर्यटनाशी निगडीत संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोध निबंध यांचा आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. पर्यटन, पर्यटक यांच्या व्याख्या, पर्यटनाचे स्वरूप, व्याप्ती व महत्व, पर्यटनावर परिणाम करणारे प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय घटक, पर्यटनाचे वर्गीकरण, पर्यटन विषयक संकल्पना, नियोजन व धोरणे या घटकांचा पुस्तकाच्या लिखाणात समावेश करण्यात आला आहे.सहल नियोजनाची प्रात्यक्षिके यामध्ये सहल नियोजन, सहलीचे प्रकार, सहल नियोजनाचा आरखडा, सहल पॅकेजचा खर्च आणि अंदाजपत्रक, प्रवासाची कागदपत्रे आणि आरक्षण प्रक्रिया तसेच अभ्यास सहलीचा अहवाल लेखन या घटकांचा समावेश केला आहे. 

विभाग 1
पर्यटन भूगोलाची ओळख
(Introduction to Tourism Geography)
1. पर्यटन भूगोलाची ओळख...............................................11
(Introduction of Tourism Geography)
1.1 पर्यटन भूगोलाची व्याख्या
(Definition of Tourism Geography)
1.2 पर्यटक व पर्यटन व्याख्या
(Definition of Tourist and Tourism)
1.3 पर्यटन भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती
(Nature and Scope of Tourism Geography)
1.4 पर्यटनाचे महत्त्व
(Importance of Tourism)

2. पर्यटनाचे प्रकार व वर्गीकरण............................................29
(Types and Classification of Tourism)
2.1 पर्यटनाचे वर्गीकरण
(Classification based on)
2.1.1 राष्ट्रीयत्व (Nationality)
2.1.2 प्रवास कालावधी (Travel Time)
2.1.3 पर्यटनाचा उद्देश (Purpose)
2.2 पर्यटनातील संकल्पना
(Concept of Tourism)
2.2.1 भू-पर्यटन (Geo-tourism)
2.2.2 पर्यावरण पूरक पर्यटन (Eco-Tourism)
2.2.3 वन्यजीव पर्यटन (Wildlife Tourism)
2.2.4 कृषी पर्यटन (Agro-Tourism)
2.2.5 आरोग्य / वैद्यकीय पर्यटन (Health/Medical Tourism)
2.2.6 क्रीडा आणि साहस पर्यटन
(Sports and Adventure Tourism)

3. पर्यटनाचे घटक व पर्यटन धोरणे.........................................44
(Determinants and Policies of Tourism)
3.1 पर्यटनाचे घटक (Determinants of Tourism)
3.1.1 प्राकृतिक घटक
(Physical Determinants)
1. उठाव / भूरूपे (Relief)
2. हवामान (Climate)
3. वन आणि वन्यजीव (Forest and Wildlife)
4. जलाशये (Water bodies)
3.1.2 सामाजिक व सांस्कृतिक घटक
(Socio-Cultural Determinants)
1. धार्मिक (Religious)
2. ऐतिहासिक (Historical)
3. क्रीडा (Sports)
4. वास्तुशिल्प किंवा स्थापत्यकलेची आकर्षणे
(Architectural Attractions)
3.1.3 राजकीय घटक (Political Determinants)
1. धोरणे (Policies)
2. सुलभता (Accessibility)
3. पर्यटकांची सुरक्षितता (Safety of Tourists)
3.2 पर्यटन धोरणे
(Tourism Policy)
1. जागतिक पर्यटन संघटना (World Tourism Organization)
2. भारतीय पर्यटन विकास महामंडळ
(Indian Tourism Development Corporation)
3. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
(Maharashtra Tourism Development Corporation)

विभाग 2
सहल नियोजनाची प्रात्यक्षिके
(Practicals in Tour planning)
4. सहल नियोजन आणि प्रवास आराखड्याची ओळख ...................82
(Introduction to Tour planning and Itinerary Design)
4.1 सहल नियोजन
(Tour Planning)
4.1.1 सहल नियोजनाचा अर्थ (Meaning of Tour Planning)
4.1.2 सहल नियोजनाचे महत्त्व (Importance of Tour Planning)
4.2 सहलींचे प्रकार
(Types of Tours)
4.2.1 देशांतर्गत (Domestic)
4.2.2 आंतरराष्ट्रीय (International)
4.2.3 सांस्कृतिक (Cultural)
4.2.4 साहसी (Adventure)
4.2.5 पर्यावरण-पूरक पर्यटन (Eco-tourism)
4.3 प्रवास आराखड्याचे घटक
(Components of Itinerary)
4.3.1 मार्ग (Route)
4.3.2 कालावधी (Duration)
4.3.3 खर्च (Cost)
4.3.4 आकर्षणे (Attractions)
4.4 प्रवास आराखडा तयार करण्याची तत्त्वे
(Principles of Itinerary Preparation)
4.5 एक दिवसीय सहलीचा नियोजन आराखडा तयार करणे
(Preparation of One Day Tour Plan)

5. सहल पॅकेजेचा खर्च आणि अंदाजपत्रक ...............................98
(Costing and Budgeting of Tour Package)
5.1 सहल खर्चाचे घटक (Elements of Tour Cost)
5.1.1 वाहतूक (Transport)
5.1.2 निवास (Accommodation)
5.1.3 भोजन (Food)
5.1.4 प्रवेश शुल्क (Entry Fees)
5.2 सहल पॅकेजसाठी खर्च पत्रक तयार करणे
(Preparation of cost sheet for tour package)
5.3 2-3 दिवसांच्या सहलीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे
(Prepare tour budget for 2-3 Days Tour)

6. प्रवासाची कागदपत्रे आणि आरक्षण प्रक्रिया...........................104
(Travel Documentation and Booking Procedures)
6.1 प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे
(Basic Travel Documents).
6.1.1 ओळखपत्र (ID Proof)
6.1.2 तिकिटे (Tickets)
6.1.3 परवाने (Permits)
6.2 पारपत्र आणि व्हिसा अर्जाच्या प्रक्रियेची ओळख
(Introduction to Passport and Visa Process)
6.3 वाहतूक साधनांचे आरक्षण
(Modes of Transport Booking)
6.3.1 रेल्वे (Railway)
6.3.2 विमान (Air)
6.3.3 बस (Bus)
6.4 हॉटेल आरक्षण प्रक्रिया : ऑनलाइन/ऑफलाइन
(Hotel Booking Procedures: Online/ Offline)

7. पर्यटन स्थळांचे नियोजन आणि भेट...................................113
(Planning and visiting to tourist places)
7.1 अल्प किंवा दीर्घ कालावधीच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा स्थानिक सहलीचे नियोजन (Preparation of one short or long international, national/local tour plan)
7.2 अभ्यास सहलीचा अहवाल लेखन
(Study tour report writing)

संदर्भ ग्रंथसूची...............................................................120

💬

Chat with us