Welcome to Prashant Publications

Rs. 275.00
Availability: 10 left in stock

पर्यटन भूगोल ही मानवी भूगोलाची अतिशय नाविन्यपूर्ण अशी शाखा आहे. 1950 च्या दशकापर्यत पर्यटन भूगोलाला स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून स्विकारले गेले होते. संयुक्त संस्थाने व जर्मनीतील वैज्ञानिक कार्यात पर्यटन भूगोलाचे अभ्यास...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यटन भूगोल
- +

पर्यटन भूगोल ही मानवी भूगोलाची अतिशय नाविन्यपूर्ण अशी शाखा आहे. 1950 च्या दशकापर्यत पर्यटन भूगोलाला स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून स्विकारले गेले होते. संयुक्त संस्थाने व जर्मनीतील वैज्ञानिक कार्यात पर्यटन भूगोलाचे अभ्यास क्षेत्र आधोरेखित केले गेले. भूगोल तज्ञांनी नव्या क्षेत्रांचा अभ्यास करुन पर्यटन भूगोलाची अचूकता सुधारण्यास मदत केली. सध्याच्या काळातील ‘पर्यटन’ हा शब्द प्रयोग 13 व्या शतकापासून प्रचलित झाला.
पर्यटनासाठी पर्यटक हा महत्वाचा केंद्र बिंदू आहे. पर्यटन हा मानवाचा अत्याधुनिक आर्थिक व्यवसाय असुन तो फार झपाट्याने विकसित होत आहे. पर्यटन व्यवसाय पर्यावरणाशी संबधित आहे. पर्यावरण व त्यातील बदल मानवाचे आर्थिक व्यवहार व साधनसंपत्ती त्याचे स्थळ व काळ संदर्भातील अध्ययन भूगोलशास्त्रात केले जाते. त्यातूनच पर्यटन भूगोल हि शाखा निर्माण झाली.

प्रस्तुत पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख, पर्यटनात आधुनिक आणि पर्यटन प्रकार, पर्यटनाचे परिणाम, भारतातील पर्यटन, कोकणातील पर्यटन विकास, खान्देशातील पर्यटन विकास, गुजरात राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्रातील गड किल्ले इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केल्याने सर्वांसाठी ते उपयुक्त ठरेल यात शंका नाही.