Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यटन विपणन (Tourism Marketing)
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गाकरीता ‘पर्यटन विपणन’ विषय सत्र-4 साठी लेखी स्तरावर निश्चित केला आहे.
त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.            

प्रकरण 1........................................................... 7
पर्यटन विपणनाची ओळख
1.1 पर्यटन विपणनाची संकल्पना व व्याप्ती
1.2 पर्यटन उत्पादनांचे स्वरूप व वैशिष्ट्ये
1.3 पर्यटन विकासात विपणनाची भूमिका
1.4 पर्यटन विपणनातील हितधारक

प्रकरण 2................................................................. 25
पर्यटन विपणनाचे प्रशासन
2.1 पर्यटन विणनाची संघटनात्मक रचना
2.2 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थांची भूमिका
2.3 पर्यटन धोरणे व विपणन समन्वय

प्रकरण 3................................................................ 51
प्रचार व प्रसिद्धी
3.1 पर्यटनाच्या प्रचारात माध्यमांची भूमिका
3.2 पर्यटनातील जनसंपर्क
3.3 जाहिरात, वैयक्तिक विक्री आणि विक्री प्रोत्साहन
3.4 पर्यटनातील थेट विपणन
3.5 पर्यटन माहितीपत्रके (टूर ब्रोशर्स) यांची रचना व मुद्रण
3.6 पर्यटनातील डिजिटल विपणन व ई-ब्रोशर्स

संदर्भ ग्रंथसूची.......................................................... 78

💬

Chat with us