Welcome to Prashant Publications

Rs. 850.00 10% OFF
Availability: 10 left in stock

थोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण महर्षी, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचे अध्वर्यू माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजीराव रणधीर हे खानदेशातील गांधी विचारांचे अनुयायी, साने गुरुजी, संत गाडगेबाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू,...

  • Name : प्रकाशाचे बेट (स्वातंत्र्य सैनिक कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांचे चरित्र)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : General
  • Manufacturing : November 2026
  • Total Pages : 298 Pages
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रकाशाचे बेट (स्वातंत्र्य सैनिक कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांचे चरित्र)
- +

थोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण महर्षी, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचे अध्वर्यू माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजीराव रणधीर हे खानदेशातील गांधी विचारांचे अनुयायी, साने गुरुजी, संत गाडगेबाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू, महात्मा फुले यांच्या विचारांचे पाईक म्हणून महाराष्ट्रातल्या थोर पुरुषांच्या मालिकेत विराजमान आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यात कर्मवीरांचे योगदान सुवर्णाक्षरांनी मंडित आहे. राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर बोराडीची नाममुद्रा कोरली गेल्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर अण्णासाहेबांनाच जाते. 
मागासवर्गीय मानल्या गेलेल्या जातीत जन्माला येऊन, सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेशी आणि अभावांशी लढून, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व झोकून देऊन, सातपुड्याच्या पायथ्याशी वंचितांचे जीवन जगणाऱ्या समूहाचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाची गंगा आणून, राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाही मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करून, पुरोगामी महाराष्ट्र ही प्रतिमा अखंडित राहण्यासाठी पुरोगामी चळवळींसाठी उत्तरायुष्य वेचून कर्मवीरांनी आपली ‘कर्मवीर’ ही लोकबिरूदावली यथार्थ ठरवली. 
काळ बदलतो, जुनी माणसे जगण्याच्या रंगभूमीवरून निघून जातात. नवी माणसे येतात. काळाचे अखंड चक्र सुरू राहते. तथापि विचारधारा, कर्मधारा या शाश्वत गोष्टी असतात. कर्मवीर अण्णासाहेब ही एक संस्था अशीच शाश्वत गोष्ट आहे. विचार आणि कार्याच्या रूपाने कर्मवीर अण्णासाहेब अजरामर आहेत. त्यांची विचारशिल्पे आणि कार्यशिल्पे याची ग्वाही देतात. 
नव्या पिढीला आदर्शांची वानवा आहे. सांप्रतकालीन राजकारण्यांनाही उत्तम अशा लोकप्रतिनिधीच्या आदर्शाची वानवा आहे. समर्पित, एकनिष्ठ अशा राष्ट्रप्रेमीच्या आदर्शाची वानवा आहे, विद्यार्थी केेंद्रबिंदू मानून ज्ञानमंदिरे स्थापन करणाऱ्या शाळासंचालकाच्या आदर्शाचीही वानवाच आहे. सत्यनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ अशा समाजाच्या निर्मितीसाठी आयुष्याचा मोठा कालखंड समर्पित करणाऱ्या समाजसेवकाच्या आदर्शाचीही वानवा आहे. अशा चोहोबाजूने मूल्य ऱ्हासाच्या अंधारपर्वात, आदर्शांच्या अभावात कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजीराव रणधीर यांचे जीवन हा लखलखता प्रकाशतारा आहे. प्रकाशाचे बेट आहे. 
प्रस्तुत ग्रंथनिर्मितीच्या प्रेरणा सुस्पष्ट आहेत. समाजाच्या सांप्रतकालीन सर्वांगीण पराभवाच्या या काळात समाजासमोर काही एक आदर्श ठेवणे काळाची अपरिहार्य गरज आहे. कर्मवीर अण्णासाहेबांचे जीवन आणि कार्य समाजासमोर विशेषत: नव्या पिढी समोर ठेवणे ही अपरिहार्य गरज आहे. यापूर्वी वर्तमानपत्री लेखातून, विविध निमित्ताने प्रकाशित झालेल्या स्मरणिकांतून, संस्थेच्या ‘सत्यव्रत’ या मुखपत्रातून, काही लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथांतून कर्मवीर अण्णासाहेबांचे जीवनचरित्र उपलब्ध आहे. त्या ग्रंथसंपदेमध्ये कर्मवीरांच्या प्रत्यक्षात संपर्कात आलेल्या शेकडो बंधू- भगिनींच्या आठवणींचा समावेश करून हा ग्रंथ तयार झाला आहे. 

ग्रंथलेखनामागील भूमिका....................................................................................7
- डॉ. फुला बागूल

मा. संस्थाध्यक्षांचे मनोगत...................................................................................9
- डॉ. भाऊसो. ना. तुषारजी विश्वासराव रंधे

कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांचे बालपण व शिक्षण...........11
- डॉ. फुला बागुल

कर्मवीर अण्णासाहेबांचा स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग..............................13
- डॉ. ए. एम. देशमुख

कर्मवीर अण्णासाहेबांचे सामाजिक कार्य....................................................................27
- डॉ. आर. एन. लुंगसे

कर्मवीर अण्णासाहेबांचे राजकीय क्षेत्रातील योगदान.........................................88
- डॉ. एम. व्ही. पाटील

कर्मवीर अण्णासाहेबांचे शैक्षणिक कार्य ................................................................105
- डॉ. मनिषा वर्मा

कर्मवीर अण्णासाहेबांचे सहकार व कामगार क्षेत्रातील योगदान.............136
- प्रा. एस. एस. वसावे

स्त्री शिक्षण, सुधारणा व कर्मवीर व्यंकटराव रणधीर.......................................144
- डॉ. ए. एम. देशमुख

मरणोपरांत वारसा.................................................................................................148
- प्रा. अरविंद भामरे

निराधार व्यक्ती ते यशस्वी व्यक्ती..................................................................162
- प्रा. अरविंद भामरे

ज्येष्ठांनी सांगितलेल्या आठवणी / लेख / मुलाखती / अनुभव..........173

💬

Chat with us