Welcome to Prashant Publications

Rs. 175.00 10% OFF
Availability: 10 left in stock


हे पुस्तक केवळ वाचनासाठी नाही तर ते संवादासाठी आहे. तुमच्या अनुभवांनी ते पूर्ण होईल, तुमच्या प्रतिप्रश्नांमुळे ते जिवंत राहील, आणि तुमच्या प्रयोगांनी त्याचा अर्थ बदलत जाईल.
या पुस्तकात आपण प्रतिभेची मानसशास्त्रीय...

  • Name : प्रज्ञावंत - प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार
  • Vendor : Prashant Publication
  • Type : General
  • Manufacturing : May 2026
  • Total Pages : 136 Pages
  • Barcode : 9789377762513
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रज्ञावंत - प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार
- +


हे पुस्तक केवळ वाचनासाठी नाही तर ते संवादासाठी आहे. तुमच्या अनुभवांनी ते पूर्ण होईल, तुमच्या प्रतिप्रश्नांमुळे ते जिवंत राहील, आणि तुमच्या प्रयोगांनी त्याचा अर्थ बदलत जाईल.
या पुस्तकात आपण प्रतिभेची मानसशास्त्रीय व्याख्या, प्रतिभा ओळखण्याची प्रक्रिया, सर्जनशीलतेची वाढ घडवणारे घटक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज यांची भूमिका, प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व घडवणारी विचारसरणी यांचा सरळ व अनुभवाधारित उलगडा करणार आहोत. हे पुस्तक उपदेश नव्हे, प्रेरणा आहे. हे तत्त्वज्ञान नव्हे तर अनुभवातून संचित झालेले वास्तव आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक केवळ प्रतिभावंतांसाठी नाही, तर प्रतिभा शोधणाऱ्यांसाठी आहे. या पुस्तकाचे अंतिम उद्दिष्ट आहे की “प्रत्येक मनुष्य प्रतिभावंत बनू शकतो, जर तो स्वतःला ओळखण्याचे साहस करेल.”

या पुस्तकाचा उद्देश फक्त प्रज्ञावंत घडण्याची प्रक्रिया हे सांगणे नाही. उद्देश आहे, प्रज्ञावंत कसा घडतो, आणि त्याचे समाजासाठी काय योगदान असते याचा मागोवा घेणे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचकाला स्वतःला ओळखण्याच्या आणि विस्तारण्याच्या दिशेने आमंत्रण आहे - जिथे निरीक्षण हे साधन आहे, अनुभव ही प्रयोगशाळा आहे, अपयश हे शिक्षक आहे आणि जीवन हेच विद्यापीठ आहे. 
ही प्रस्तावना माझी वैयक्तिक भावना नसून, प्रत्येक साध्या व्यक्तीतून महानतेचा अंकुर जागवण्याचा प्रयत्न आहे. जर वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, विचार पेटला, किंवा एखादा नवीन प्रयोग सुरू झाला, तर या पुस्तकाचा उद्देश पूर्ण झाल्याचे मला पुरेपूर समाधान देईल. माझी खात्री आहे की, हे पुस्तक तुमच्या विचारांना दिशा देईल, प्रश्न निर्माण करेल आणि तुमच्या अंतर्मनातील सुप्त प्रतिभेला जागृत करण्यास मदत करेल. चला तर, आत्मान्वेषणाच्या या प्रवासाला सुरुवात करूया: प्रतिभेपासून सर्जनशीलतेकडे, आणि सर्जनशीलतेपासून प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्वाकडे.

भाग 1 : प्रतिभा
प्रकरण 1. प्रतिभा: संकल्पना, स्वरूप आणि वैशिष्ट्ये....................13

प्रकरण 2. उक्रांतिशास्त्र आणि प्रतिभा....................................17

प्रकरण 3. प्रतिभा: विकास, घटक आणि प्रक्रिया.........................20

प्रकरण 4. प्रतिभा आणि मानसशास्त्र.....................................23

प्रकरण 5. प्रतिभा आणि तत्त्वज्ञान........................................28

भाग 2 : प्रतिभा आणि सर्जनशीलता
प्रकरण 6. सर्जनशीलता..................................................32

प्रकरण 7. प्रतिभा आणि सर्जनशीलता यातील परस्परसंबंध................37

प्रकरण 8. प्रतिभा व सर्जनशीलतेचे महत्त्व................................39

प्रकरण 9. प्रतिभा, सर्जनशीलता आणि समाज............................41

प्रकरण 10. प्रतिभा आणि सर्जनशीलतेचे आधुनिक संदर्भ..................43

प्रकरण 11. प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व: स्वभाव, जीवनदृष्टी आणि संघर्ष.......45

भाग 3 : प्रतिभावंत ते प्रज्ञावंत
प्रकरण 12. प्रज्ञा: महत्त्व, स्वरूप आणि तत्त्वज्ञान..........................48

प्रकरण 13. प्रज्ञा विकसित करणारे घटक..................................51

प्रकरण 14. प्रतिभावंत ते प्रज्ञावंत - उत्क्रांतीची पायरी.....................54

प्रकरण 15. प्रज्ञावंताची जडणघडण-कौटुंबिक, सामाजिक आणि
शैक्षणिक...............................................57

प्रकरण 16. प्रज्ञावंताचे वैशिष्ट्य - गुण, व्यक्तिमत्त्व आणि कार्यशैली......61

प्रकरण 17. प्रज्ञावंत व्यक्तीची लक्षणे आणि ओळख.......................63

प्रकरण 18. प्रज्ञावंताचे प्रकार - बहुआयामी स्वरूप........................66

प्रकरण 19. प्रज्ञावंत: भारतीय व जागतिक संदर्भातील प्रेरक
उदाहरणे.......69

प्रकरण 20. प्रज्ञावंताचे योगदान - समाज, संस्कृती आणि सभ्यता.........72

प्रकरण 21. प्रज्ञावंताचा समाजधर्म.........................................75

भाग 4 : प्रज्ञा
प्रकरण 22. प्रज्ञा आणि सर्जनशीलता......................................79

प्रकरण 23. प्रज्ञा आणि नैतिक मूल्ये.......................................81

प्रकरण 24. प्रज्ञा आणि व्यक्तिमत्त्व विकास................................83

प्रकरण 25. प्रज्ञा आणि नेतृत्व.............................................85

प्रकरण 26. प्रज्ञा आणि निर्णयक्षमता.......................................87

प्रकरण 27. प्रज्ञा आणि संकट व्यवस्थापन.................................89

प्रकरण 28. प्रज्ञा आणि सामाजिक दायित्व.................................91

प्रकरण 29. प्रज्ञा आणि सामाजिक संवाद..................................93

प्रकरण 30. प्रज्ञा आणि जीवनातील संतुलन................................95

प्रकरण 31. प्रज्ञा आणि अध्ययन शीलता..................................97

प्रकरण 32. प्रज्ञा आणि स्वाध्याय..........................................99

प्रकरण 33. प्रज्ञा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय.............................101

प्रकरण 34. उपसंहार - प्रज्ञेचा सारांश आणि संदेश......................103

परिशिष्ट-विषय प्रवेश: संकल्पना व संज्ञांची पार्श्वभूमी....................105

संदर्भ ग्रंथसूची..............................................................134

💬

Chat with us