Your cart is empty now.
इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यटन या संकल्पनेची शास्त्रशुद्ध मांडणी करून देणे, पर्यटन नियोजनाचे महत्त्व ज्ञात करून देणे, भारतातील विविध प्रकारच्या प्रमुख पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे, पर्यटनातील इतिहासाची भूमिका स्पष्ट करणे, तसेच पर्यटन क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देश्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांवद्वारा (छएझ-2020) नुसार द्वितीय वर्ष कला वर्गात इतिहास विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दोन्ही सत्रासाठी ‘प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन’ हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या विषयासाठी संदर्भग्रंथ म्हणून या ग्रंथलेखनाचा उद्योग केला आहे.
या ग्रंथ लिखाणाकरिता उपलब्ध संदर्भ साधनांपासून ते माहितीच्या
महाजालातील संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे हा ग्रंथ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेच, पण नवोदित इतिहास संशोधक, अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल.