Your cart is empty now.
जगभरात अंदाजे 500 प्रकारच्या व भारतात 40 पेक्षा अधिक लोकप्रिय फळझाडांच्या जाती आहेत. फुले आकर्षक आकाराची, रंगाची असतात व त्यांचे महत्व वाढतच आहे. अगदी मानवी जीवनाचे स्वागत व निरोप, धार्मिक कारणांसाठी विविध औषधी उद्योगांसाठी, मानवी स्वास्थवर्धक आहेत तर फळे जीवनद्रव्यांनी अत्यंत समृद्ध आहेत. आपणा, सर्वासाठी या क्षेत्राचे प्रायोगिक, प्रात्यक्षिक ज्ञान गरजेचे आहे. हे वेगाने विकसीत होणारे आर्थिक व्यवस्थापनाचे शास्र आहे. व्यवसायिक फुले व फळे, त्यांच्या संगोपन व संवर्धनासाठी विविध पद्धती, फुलांच्या व फळांच्या लागवडीचे तंत्रज्ञान, पुनरुत्पादनाच्या पद्धती, फुलं व फळांपासुन विविध प्रकरची उत्पादने पद्धती, काही महत्वाच्या फुलांची, फळांची ओळख त्यांच्या लागवडीक्षम जाती, प्रजाती याची माहिती प्रत्यक्ष प्रयोगाव्दारे ओळख करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकांत केला आहे.
फुलशेती आणि फळशेती यांचे तांत्रिक ज्ञान प्रयोगाव्दारे हया छोटया पुस्तिकांव्दारे लेखकांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. याकरीता प्रशांत पब्लिकेशन्सचे प्रकाशक श्री. रंगराव पाटील व त्यांच्या सर्व स्टाफचे कौतुक आहे कारणे याकरीता त्यांनी आम्हांस प्रवृत्त केले सर्वांचे आभार.
फुलशेती (ऋश्रेीळर्लीर्श्रीीींश) आणि फळशेती (झेोर्लीर्श्रीीींश) हे आर्थिक स्तर वाढवण्यासाठी रोजगारक्षम औद्योगिक विकासांकरीता वेगाने विकसीत होणारे तंत्रज्ञान आहे. आम्ही सर्वांनी याकरीता माहिती गोळा केली व त्याचे आमच्या शब्दांत मांडण्याच्या प्रयत्न केला आहे.