Welcome to Prashant Publications

Rs. 395.00 10% OFF
Availability: 10 left in stock

बँकिंग आणि वित्त-ख हे सत्र-3 व 4 चे एकत्रित क्रमिक पुस्तक व संदर्भग्रंथ आपल्या हाती देतांना आम्हांला विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय व संदर्भसाहित्याच्या आधारे भारतीय बँक व्यवस्थेच्या संरचनेचे सविस्तर...

  • Name : बँकिंग व वित्त (Banking and Finance)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBCOM
  • Barcode : 9789389493337

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

बँकिंग व वित्त (Banking and Finance)
- +

बँकिंग आणि वित्त-ख हे सत्र-3 व 4 चे एकत्रित क्रमिक पुस्तक व संदर्भग्रंथ आपल्या हाती देतांना आम्हांला विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय व संदर्भसाहित्याच्या आधारे भारतीय बँक व्यवस्थेच्या संरचनेचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. वाणिज्य शाखेचे विद्यार्थी व बँक व्यवस्थेच्या रचनेचे अभ्यासक यांना विषयाची जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढावी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखाण करतांना बँकविषयक संकल्पनांची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे. त्यासंदर्भात बँकव्यवसायातील अलीकडील बदल, अद्ययावत आकडेवारी व माहीतीचे संदर्भ दिले आहे. या पुस्तकाचे लिखाण
करतांना अभ्यास मंडळाचे सुचविलेल्या संदर्भ ग्रंथाबरोबर इतरही आवश्यक व उपयुक्त ग्रंथांचा आवर्जुन वापर केला आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी असणाऱ्या संदर्भ ग्रंथाचा वापर करून विद्यार्थ्यांना बँकिंग विषयक स्पर्धा परीक्षांना सामोरे जाता यावे हाच उद्देश आहे. आर.बी.आय.चे संकेतस्थळ व विविध अहवालांचाही संदर्भ घेतला गेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाच्या मुल्यांकनांच्या आकृतीबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून
पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.     

प्रकरण 1....................................................9
भारतीय बँकव्यवस्थेची संरचना
1.1 भारतीय बँकव्यवस्थेची उत्क्रांती
1.2 भारतीय बँकव्यवस्थेची रचना
1.3 आर्थिक विकासात बँकव्यवस्थेची भूमिका
1.4 अनुसूचित व बिगर अनुसूचित बँका
1.5 भारतातील बँकव्यवस्थेसमोरील आव्हाने
1.6 कोरोना चे भारतीय बँकिंगक्षेत्रावरील परिणाम

प्रकरण 2................................................41
मध्यवर्ती बँक व्यवसाय
2.1 मध्यवर्ती बँक व्यवसाय - व्याख्या
2.2 भारतीय रिझर्व्ह बँकेची उत्क्रांती
2.3 भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये
2.4 भारतातील सध्याची चलन व्यवस्था
2.5 बँक दर, रोख राखीव प्रमाण, वैधानिक रोखता प्रमाण, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर. या संकल्पना समजून घेणे.

प्रकरण 3.......................................................71
खाजगी बँक व्यवसाय
3.1 खाजगी बँक व्यवसाय अर्थ आणि वैशिष्ट्ये
3.2 खाजगी बँक व्यवसायाचे वर्गीकरण-भारतातील खाजगी बँका-जुन्या आणि नवीन खाजगी बँका, परकीय बँका.
3.3 आर्थिक विकासात खाजगी बँक व्यवसायाची भूमिका.
3.4 भारतातील खाजगी बँकांची कामगिरी.
3.5 भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकासमोरील आव्हाने.

प्रकरण 4............................................................ 120
सार्वजनिक क्षेत्रातील बँक व्यवसाय
4.1 सार्वजनिक क्षेत्रातील बँक : व्याख्या आणि वैशिष्ट्ये
4.2 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे वर्गीकरण -
4.2.1 स्टेट बँक ऑफ इंडिया : उत्क्रांती, कार्ये व कामगिरी
4.2.2 राष्ट्रीयीकृत बँका : सामाजिक नियंत्रण, राष्ट्रीयीकरणाचा अर्थ,
राष्ट्रीयीकरणाच्या बाजूचे व विरोधी युक्तिवाद, संलग्न बँकांचे विलीनीकरण
4.2.3 प्रादेशिक ग्रामीण बँका : उद्दिष्टे, कार्ये, भांडवल, प्रादेशिक ग्रामीण
बँकांच्या समस्या
4.2.4 अग्रणी बँक योजना
4.3 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपुढील आव्हाने

प्रकरण 5.................................................. 178
भारतातील सहकारी बँका
5.1 सहकाराची तत्वे
5.2 भारतातील सहकारी बँकांची उत्क्रांती
5.3 सहकारी बँकांची आर्थिक विकासातील भूमिका
5.4 सहकारी बँकांच्या विकासातील महत्त्वाचे आव्हाने

प्रकरण 6.......................................................... 209
भारतातील विकास बँका
6.1 विकास बँक : अर्थ
6.2 भारतातील विकास बँकांची कार्ये
6.3 भारतातील विकास बँकांची आर्थिक विकासातील भूमिका
6.4 भारतातील विकास बँकांसमोरील आव्हाने

प्रकरण 7......................................................... 235
निवडक महत्त्वपूर्ण बँक व्यवसाय संकल्पना
7.1 मध्यवर्ती बँक व्यवसाय
7.2 व्यापारी बँक व्यवसाय
7.3 शाखा बँक व्यवसाय
7.4 एकावयवी (घटक) बँक व्यवसाय
7.5 घाऊक बँक व्यवसाय
7.6 किरकोळ बँक व्यवसाय
7.7 सामाजिक बँक व्यवसाय
7.8 इस्लामिक बँक व्यवसाय
7.9 मर्चन्ट बँकिंग
7.10 डिजिटल बँकिंग

प्रकरण 8..................................................... 295
निवडक महत्त्वपूर्ण बँक व्यवसाय संकल्पना
8.1 ऐतिहासिक दृष्टिकोन : अर्थ आणि बँकिंगक्षेत्र सुधारणेची उद्दिष्ट्ये
8.2 बँकव्यवसाय सुधारणेचे उपाय :
8.2.1 रोख राखीव निधी प्रमाण आणि वैधानिक तरलता प्रमाण
8.2.2 विवेकी/दुरदर्शीपणाचे निकष
8.2.3 भांडवल पर्याप्तता निकष
8.2.4 पतठेव प्रमाण
8.3 बँकिंग पर्यवेक्षणावरील बेसल समिती
8.3.1 बेसल 1
8.3.2 बेसल 2
8.3.3 बेसल 3
8.3.4 बेसल 4
8.4 एम नरसिंहम् समिती : 1991 च्या शिफारशी
8.5 एम नरसिंहम् समिती : 1998 च्या शिफारशी

संदर्भ ग्रंथसूची............................................................... 350

💬

Chat with us