Your cart is empty now.
‘बाजार संरचना आणि घटक किंमतीचे अर्थशास्त्र’ या ग्रंथात बाजाराचे स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पविक्रेताधिकार आणि द्विविक्रेताधिकार असे प्रकार पडतात. बाजारात पूर्ण स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा असताना उद्योग संस्था आणि उद्योगाचे वर्तन वेगवेगळे असते. कोणत्याही बाजारात उद्योग संस्था किमान खर्च घटक संयोगाच्या साहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन करुन नफ्याचे महत्तमीकरण करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक बाजारात उद्योग संस्था उत्पादन आणि किंमत निश्चिती करते. उत्पादनाबरोबरच भूमी, श्रम, भांडवल, संयोजन या घटकांना त्यांच्या वापराबद्दल खंड, वेतन, व्याज आणि नफा रुपात मोबदला दिला जातो. म्हणजेच वस्तू प्रमाणेच घटकांचीही किंमत निश्चित केली जाते.
प्रस्तुत पुस्तकात या सर्व प्रमुख व उपमुद्द्यांची पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.