Your cart is empty now.
नारायण सुर्वे हे महाराष्ट्राचे मॅक्झिम गॉर्की !
समाजाच्या तळागाळातून संघर्ष करीत वर आलेल्या या गॉर्कीला लेखक म्हणून आंतरराष्ट्रीय किर्ती मिळाली. तशीच किर्ती दोनदा सोव्हिएत रशियाकडून नेहरू पारितोषिक प्राप्त कवी सुर्व्यांना मिळाली.
दिडशे वर्षाच्या आधुनिक मराठी काव्यखंडातील तीन निर्णायक वळणे म्हणजे केशवसुत, मर्ढेकर, सुर्वे. त्यातही सुर्व्यांची कविता म्हणजे अफाट शोषित, वंचितांचा जाहीरनामा.
सुर्व्यांवर मराठीत प्रचंड लिखाण झाले. स्वत: डॉ. अनंता सूर यांचा ‘दोन अर्वाचीन कवी’ हा प्रबंध म्हणजेच त्यापैकी एक निर्भय, वस्तुनिष्ठ साहित्यकृती. या चोखंदळ लेखक संपादकाने परिश्रमपूर्वक लिहू केलेला ‘बातचीत नारायण सुर्व्यांशी’ हा ग्रंथ मराठी चाहत्यांना-अभ्यासकांना उपलब्ध झालेला अस्सल पुरावा. जुन्या-नव्या पिढीतील समीक्षक, संशोधक, अभ्यासकांपर्यंत सुर्वे अनेकांशी भरभरून बोलले. खरेतर संपूर्ण महाराष्ट्राशी सुर्व्यांचा अखंड संवाद होता. त्यामुळे ती बातचीत आजच्या महाराष्ट्राला उपलब्ध करून देणे हे सुर्व्यांचे एक चिरंतन स्मारक.
हे स्मारक पुस्तकरूपाने साकारणारे संपादक डॉ. अनंता सूर आणि प्रशांत पब्लिकेशन्सचे श्री. रंगराव पाटील यांच्याशी समस्त मराठी वाचक कृतज्ञ राहील.
– डॉ. वि. स. जोग