Welcome to Prashant Publications

Rs. 190.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखेअंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP)2020 नुसार श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy)
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखेअंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP)2020 नुसार श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून तृतीय वर्ष वाणिज्य (T.Y.B.COM.) या वर्गाकरीता ‘भारतीय अर्थव्यवस्थाला’ विषय सत्र-5 साठी लेखी स्तरावर निश्चित केला आहे. ‘भारतीय अर्थव्यवस्था’ या अभ्यासक्रमाची मांडणी करतांना एकूण 2 प्रकरणे विचारात घेतली आहेत.
‘भारतीय अर्थव्यवस्था’ (सत्र 5) हे क्रमिक पुस्तक व संदर्भग्रंथ आपल्या हाती देतांना आम्हांला विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भ साहित्यांच्या आधारे ‘भारतीय अर्थव्यवस्था’ या संदर्भात सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. प्रकरण 1 मध्ये भारतीय अर्थव्यस्थेची ओळख: भारतीय अर्थव्यवस्थेतील संधी व समस्या, उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, विकसित भारत (Viksit Bharat) ची उद्दिष्टे, मानवी विकास निर्देशांक (HDI): या घटकांचा तर प्रकरण 2 मध्ये अर्थव्यवस्थेची तीन क्षेत्रे यामध्ये कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र. वैशिष्ट्ये व समस्या, कृषी क्षेत्रातील नवीन प्रवाह व प्रवृत्ती, भारतीय अर्थव्यवस्थेत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची (MSME) भूमिका आणि समस्या, कौशल्य विकासाची संकल्पना; रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कौशल्यांचे प्रकार, औद्योगिक धोरण, स्टार्ट-अप्स आणि मुद्रा योजना, सेवा क्षेत्र:सेवांची संकल्पना, सेवांचे प्रकार, भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे महत्व इ. विषयक माहिती विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी विविध संकल्पनांची मांडणी सोप्या भाषेत करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध. व विस्तृतपणे मांडणी केली असून त्यासंदर्भातील अलिकडील अद्ययावत माहितीचे संदर्भ, आवश्यक तेथे सूची, तक्ते, आकृत्यांची मांडणी केलेली आहे. या पुस्तकाचे लिखाण करतांना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने सूचविलेल्या उपयुक्त संदर्भग्रंथाचा आवर्जून वापर केलेला आहे. विविध तज्ज्ञांचे संशोधन लेख, मुक्त विद्यापीठ पुस्तके, संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीचाही अवलंब केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मूल्यांकनासाठी नमुद केलेल्या आकृती
बंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न ही दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.

प्रकरण 1.......................................................................7
भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख
Introduction to the Indian Economy
1.1 भारतीय अर्थव्यवस्थेतील संधी व समस्या
1.2 उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
1.3 विकसित भारत (Viksit Bharat) ची उद्दिष्टे
1.4 मानवी विकास निर्देशांक (HDI): संकल्पना आणि राज्यनिहाय मानवी विकास निर्देशांक
1.5 विकसित राष्ट्रांच्या सोबत मानवी विकास निर्देशांकाची तुलना

प्रकरण 2......................................................................69
अर्थव्यवस्थेतील तीन क्षेत्रे
The Three Sectors of the Economy
2.1. कृषी क्षेत्र
2.1.1 वैशिष्ट्ये व समस्या
2.1.2 पीक पद्धती, हवामान बदल आणि हवामान बदलाचे शेतीवरील परिणाम
2.1.3 कृषी व्यवसाय: कृषी क्षेत्रातील नवीन प्रवाह व प्रवृत्ती
2.2 औद्योगिक क्षेत्र
2.2.1 प्रमुख घटक व वैशिष्ट्ये
2.2.2 भारतीय उद्योगांची रूपरेषा
2.2.3 भारतीय अर्थव्यवस्थेत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची (MSME) भूमिका आणि त्यांच्यासमोरील समस्या
2.2.4 कौशल्य विकासाची संकल्पना: रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कौशल्यांचे प्रकार - कौशल्य उन्नयन बहुकौशल्य / आंतरकौशल्य, पुनर्कौशल्य, क्षेत्रनिहाय कौशल्य विकास, औद्योगिक धोरण
2.2.5 स्टार्ट-अप्स आणि मुद्रा योजना
2.3 सेवा क्षेत्र (तृतीयक क्षेत्र)
2.3.1 सेवांची संकल्पना
2.3.2 सेवांचे प्रकार
2.3.3 भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे योगदान

संदर्भ ग्रंथसूची..............................................................131

💬

Chat with us