Welcome to Prashant Publications

Rs. 270.00 10% OFF
Availability: 0 left in stock

हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित आणि अद्ययावत अभ्यासक्रमावर पूर्णपणे आधारित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या शिफारशींचा स्वीकार करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात जो...

Click here to be notified by email when this product becomes available.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय बँकिंग (Indian Banking)

हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित आणि अद्ययावत अभ्यासक्रमावर पूर्णपणे आधारित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या शिफारशींचा स्वीकार करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात जो अमूलाग्र बदल घडवून आणला आहे, त्याला अनुलक्षूनच या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. NEP चा मुख्य भर हा विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे हा नसून, त्यांच्यात विश्लेषणात्मक क्षमता आणि व्यावहारिक समज निर्माण करणे हा आहे. सत्र 5वे (Semester V) मधील Major Elective अंतर्गत समाविष्ट असलेल्या या 2 क्रेडिटच्या (02 Credits - Theory) अभ्यासक्रमातील प्रत्येक संकल्पनेला अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ग्रंथातून केला आहे. या पुस्तकाची रचना दोन मुख्य आणि अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये (Modules) करण्यात आली आहे: पहिल्या घटकात (Banking System) आपण बँकिंग प्रणालीचा उगम, तिचा विकास आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत बँका बजावत असलेली भूमिका याविषयी सखोल चर्चा केली आहे. मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची स्थापना, तिची बदलती कार्ये आणि देशातील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे मौद्रिक धोरण (Monetary Policy) यावर विश्लेषणात्मक प्रकाश टाकला आहे. पत नियंत्रणाची परिमाणात्मक व गुणात्मक साधने आजच्या आर्थिक परिस्थितीत कशी प्रभावी ठरतात, हे समजून घेण्यासाठी हा भाग अत्यंत उपयुक्त ठरेल. दुसऱ्या घटकात (Banking in India) भारतातील बँकिंगच्या अथांग विश्वाचा परिचय करून देण्यात आला आहे. व्यावसायिक बँका, सहकारी क्षेत्र, प्रादेशिक ग्रामीण बँका, सार्वजनिक व खासगी बँका, परदेशी बँका, ऑफशोअर बँकिंग आणि एदखच इरपज्ञ सारख्या विशेष संस्थांच्या कार्यपद्धतीची सोप्या भाषेत उकल केली आहे. यासोबतच, बँकिंग क्षेत्राचा पाया असलेली पतनिर्मितीची प्रक्रिया (Credit Creation Process), भारतीय बँकिंग क्षेत्राचे चित्र बदलणारे बँकांचे विलिनीकरण व संधारणा (Mergers and Consolidations) आणि आजच्या डिजिटल युगात बँकांसमोर उभी ठाकलेली विविध आव्हाने यावर अत्यंत वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी का नावीन्यपूर्ण व फायदेशीर ठरेल?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पॅटर्ननुसार अचूक मांडणी: पुस्तकातील प्रत्येक घटक आणि प्रकरण हे पुणे विद्यापीठाने निश्चित केलेल्या क्रेडिट सिस्टीम आणि गुणदान पद्धतीशी तंतोतंत जुळणारे आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा ठरवणे सोपे जाईल.
क्लिष्ट संकल्पनांचे सोपे मराठीकरण: अर्थशास्त्रातील तांत्रिक आणि इंग्रजी संज्ञा सर्वसामान्य विद्यार्थ्याला सहज रुचाव्यात अशा सोप्या, प्रवाही आणि सुटसुटीत मराठी भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
परीक्षेतील गुण मिळवून देणारी रचना: उत्तरपत्रिकेत मुद्देसूद आणि प्रभावी लेखन कसे करावे, याचा अदृश्य आराखडा या पुस्तकातील मांडणीवरून विद्यार्थ्यांना सहज मिळेल.
स्पर्धा परीक्षांसाठी पायाभूत संदर्भ: हे पुस्तक केवळ विद्यापीठाच्या पदवी परीक्षेपुरते मर्यादित न राहता MPSC, UPSC, IBPS, RBI Grade B आणि इतर बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक भक्कम पाया (Base Concept Builder) म्हणून काम करेल.
व्यावहारिक आणि अद्ययावत माहितीचा समावेश: पुस्तकात केवळ जुने सिद्धांत न ठेवता, अद्ययावत आकडेवारी आणि बँकिंग क्षेत्रातील ताज्या घडामोडींचा समन्वय साधला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची विषयातील रुची नक्कीच वाढेल.

1. बँकिंग प्रणाली...........................................................07
(Banking System)
1.1 बँकिंग प्रणाली: अर्थ आणि उत्क्रांती
(Banking System: Meaning and Evolution)
1.2 बँकिंग प्रणालीची रचना आणि कामकाज
(Structure and Operations of Banking System)
1.3 आर्थिक विकासात बँकिंगची भूमिका
(Role of Banking in Economic Development)
1.4 भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) : भूमिका आणि कार्ये
(Reserve Bank of India (RBI): Role and Functions)
1.5 चलनविषयक धोरण: अर्थ आणि उद्दिष्टे, पत नियंत्रण: अर्थ आणि पत नियंत्रणाची साधने (Monetary Policy- Meaning and Objectives, Credit control-Meaning and Instruments of Credit Control)

2. भारतातील बँकिंग .....................................................100
(Indian Banking)
2.1 भारतातील बँकांचे प्रकार: व्यापारी, सहकारी आणि प्रादेशिक, सार्वजनिक, खाजगी, परदेशी, ऑफशोर बँका, एक्झिम बँक
(Types Banks in India: Commercial, Cooperative and Regional, Public, Private, Foreign, Offshore Banks, Exim Bank)
2.2 भारतातील बँकांची कार्ये
(Functions of Banks in India)
2.3 बँकांद्वारे पतनिर्मितीची प्रक्रिया
(Process of Credit Creation by Banks)
2.4 भारतीय बँकिंग क्षेत्रातील विलीनीकरण आणि एकत्रीकरण
(Mergers and Consolidations in Indian Banking)
2.5 भारतातील बँकांसमोरील आव्हाने
(Challenges Faced by Banks in India)

💬

Chat with us