Your cart is empty now.
प्रत्येक देशाला स्वतःचे संविधान असणे आवश्यक आहे. या संविधानात त्या देशाच्या शासनकारभारविषयक बाबींची तरतूद असते. पण त्याबरोबरच त्या देशातील जनतेच्या आशाआकांक्षेचे व त्या देशाने स्वीकारलेल्या ध्येयाचे निदर्शनही असते. स्वतंत्र राष्ट्रातील नागरिकांना स्वतःचे संविधान निर्माण करण्याचा अधिकार असतो व ते, तो अधिकार संविधानसभा नेमून बजावतात. संविधानसभेत जनतेचे प्रतिनिधी चर्चा करुन संविधान तयार करतात व अशा संविधानानुसार त्या देशाचा शासनकारभार चालतो. जनतेच्या प्रतिनिधींनी संविधानसभेत एकत्र तयार केलेले संविधान म्हणजे त्या राष्ट्राच्या राज्यकारभाराविषयीचा वेदग्रंथ होय. त्याचे प्रामाण्य सर्वश्रेष्ठ असते. संविधान हा मूलभूत कायदा असतो. त्याचे मांगल्य व पावित्र्य कायम राखण्याची जबाबदारी त्या देशातील सर्व नागरिकांवर असते.
सदर ग्रंथात भारतीय संविधान निर्मितीची संक्षिप्त माहिती, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये, संविधानाचा सरनामा, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ, निर्वाचन आयोग या संदर्भातील संविधानात्मक तरतुदींची अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.