Welcome to Prashant Publications

Rs. 375.00
Availability: 10 left in stock

‘भारतीय संविधान व शासन’ हा अभ्यास विषय स्वांतत्र्योत्तर कालखंडापासून विशेष महत्वाचा मानला जातो. हे अध्ययन क्षेत्र केवळ भारतातंर्गत महत्वाचे आहे, असे नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात एखाद्या राष्ट्राची राजकीय, सामाजिक,...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय संविधान व शासन
- +

‘भारतीय संविधान व शासन’ हा अभ्यास विषय स्वांतत्र्योत्तर कालखंडापासून विशेष महत्वाचा मानला जातो. हे अध्ययन क्षेत्र केवळ भारतातंर्गत महत्वाचे आहे, असे नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात एखाद्या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धोरणात्मक भूमिका नेमकी कशी आहे? या संबंधाचे आकलन होण्याच्या दृष्टिने त्या त्या देशाचे शासन आणि राजकारण अभ्यासाच्या दृष्टिने महत्वाचे ठरते. शासनाने केलेले अलिकडील बदल वा परिवर्तने सुद्धा अभ्यासाच्या दृष्टिने उपयुक्त असतात आणि या संदर्भाची वस्तुनिष्ठ माहिती व तिचे मूल्यमापन शासनातंर्गत काही महत्वाच्या विभागाद्वारे केले जातात. वास्तविक पाहता भारताने प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीचा अधिकृत स्विकार केल्यामुळे या संविधानिक चौकटीचा अभ्यास केल्याशिवाय आपणास अन्य राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना नीटपणे अभ्यासता येत नाही म्हणून “भारतीय संविधान व शासन’ अभ्यासणे वा समजून घेणे आजच्या परिप्रेक्ष्यात महत्वाचे आहे.

या ग्रंथात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना समकालीन सामान्य ज्ञान संबंधीचे प्रश्ने, राज्यशास्त्रातील दैनंदिन घडामोडीकरिता हा ग्रंथ निश्चितपणे उपयोगी ठरेल यात शंका नाही. हा प्रस्तुत ग्रंथ जरी पदवी स्तरावर तयार करण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात पदव्युत्तर राज्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना लाभदायक ठरू शकेल, अशी मांडणी यामध्ये करण्यात आली आहे.