Welcome to Prashant Publications

Rs. 225.00 10% OFF
Availability: 10 left in stock

“भूस्थल दर्शक नकाशावाचन आणि हवामान दर्शक नकाशे व उपग्रह प्रतिमा” हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या तृतीय वर्ष कला प्रात्यक्षिक भूगोल सत्र तीन व चार अभ्यासक्रमानुसार...

  • Name : भूस्थल दर्शक नकाशावाचन आणि हवामान दर्शक नकाशे व उपग्रह प्रतिमा
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - V | Arts
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 160 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भूस्थल दर्शक नकाशावाचन आणि हवामान दर्शक नकाशे व उपग्रह प्रतिमा
- +

“भूस्थल दर्शक नकाशावाचन आणि हवामान दर्शक नकाशे व उपग्रह प्रतिमा” हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या तृतीय वर्ष कला प्रात्यक्षिक भूगोल सत्र तीन व चार अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना भूस्थल दर्शक नकाशांचे वाचन, नकाशातील विविध चिन्हे व संकेतांक, अक्षांश-रेखांश, उंची, उतार, नदी प्रणाली, वस्ती, वाहतूक व्यवस्था आणि भूरूपांचे विश्लेषण यांचे सुलभ व शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर हवामान दर्शक नकाशांमधून तापमान, वायुदाब, वारे, पर्जन्य, ढगांची स्थिती आणि हवामान प्रणाली यांचा अभ्यास कसा करावा, याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी सुलभ आकृत्या, नकाशे, सांकेतिक चिन्हे व खुणा, उपग्रह प्रतिमा दिलेल्या आहेत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात दूरसंवेदन व उपग्रह तंत्रज्ञानाने भूगोलाच्या अभ्यासाला नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे उपग्रह प्रतिमांचे स्वरूप, प्रकार, प्रतिमा वाचनाची मूलतत्त्वे, प्रतिमा अर्थनिर्णयनाचे घटक आणि हवामान निरीक्षणासाठी वापरले जाणारे उपग्रह यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. कल्पना-1, INSAT-3D, INSAT-3DR आणि INSAT-3DS यांसारख्या भारतीय हवामान उपग्रहांची माहिती विद्यार्थ्यांना आधुनिक हवामान निरीक्षणाची वाटचाल समजून घेण्यास उपयुक्त ठरेल.
हे पुस्तक विशेषतः पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून, विषयातील संकल्पना सोप्या, सुबोध आणि शास्त्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नकाशे व उपग्रह प्रतिमांचे केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता त्यांचे निरीक्षण, विश्लेषण, अर्थनिर्णयन आणि व्यावहारिक उपयोग समजावून देणे हा या पुस्तकाचा प्रमुख हेतू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, विश्लेषणात्मक विचार, अवकाशीय आकलन आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरेल, 

प्रकरण 1.............................................................9
भू-उठाव दर्शविण्याचा पद्धती
(Methods of Representation of Relief)
(A) भू-उठावाचा अर्थ व व्याख्या
(B) भू-उठाव दाखविण्याच्या पद्धती
(a) संख्यात्मक पद्धती: स्थळ उच्चतांक, त्रिकोणमितीय स्थानके, बेंच मार्क्स, समोच्च रेषा
(b) गुणात्मक पद्धती: हॅशर्स, आकार रेषा, टेकडी छायांकन / भूरूप छायांकन, स्तर रंगछटा / उंचीनुसार रंगभरण

प्रकरण 2.............................................................0
समोच्च रेषा आणि त्यांच्या छेदाकृतींचे रेखाटन
(Drawing Contours and their Profiles)
(A) उतार: मंद उतार, तीव्र उतार, बहिर्वक्र उतार, अंतर्वक्र उतार, पायऱ्या पायऱ्यांचा / सोपान उतार
(B) उंचसखल किंवा उंचावरील भूरूपे: शंक्वाकृती टेकडी, पठार, कटक किंवा डोंगररांग, खिंड
(C) सखल किंवा खोलगट भूरूपे: मतफ आकाराची दरी, घळई, मणफ आकाराची दरी, धबधबा
(D) भूरुपीय छेद किंवा छेद: अडवा छेद आणि उभा छेद
प्रकरण 3.............................................................0
भारतीय भू-स्थलदर्शक नकाशांची ओळख
(Introduction to S.O.I. Toposheet)
(A) भारतीय भू-स्थलदर्शक नकाशांची ओळख:
(i) भारतीय सर्वेक्षण विभाग
(ii) जगाची आंतरराष्ट्रीय नकाशा मालिका
(iii) भारत आणि शेजारील देश नकाशा मालिका
(B) भू-स्थलदर्शक नकाशावरील सांकेतिक चिन्हे आणि खुणा
(C) जाळी संदर्भ:
(i) ईस्टिंग्स आणि नॉर्थिंग्स
(ii) चार-अंकी आणि सहा-अंकी जाळी संदर्भ

प्रकरण 4.............................................................0
भारतीय भूस्थलदर्शक नकाशा वाचन
(Interpretation of S.O.I. Toposheets)
(A) भारतीय भू-स्थलदर्शक नकाशा वाचन:
(i) सीमांत माहिती
(ii) प्राकृतिक रचना / भूप्रदेशाचे चढ-उतार
(iii) जलप्रणाली
(iv) नैसर्गिक वनस्पती
(v) मानवनिर्मित / सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख
(a) मानवी वस्त्या (b) वाहतूक आणि संदेशवहन
(c) व्यवसाय / आर्थिक रचना
(B) भूस्थल दर्शक नकाशा 63K/12 चे विश्लेषणात्मक संकलन

प्रकरण 5.............................................................0
भारतीय हवामान विभागाचे हवामान दर्शक नकाशे व उपग्रह प्रतिमांची ओळख
(Introduction to IMD Weather Map and Images)
(A) भारतीय हवामान विभागाच्या हवामानदर्शक नकाशांची ओळख
(B) समभार रेषांचे आकृतिबंध
(C) हवामानदर्शक नकाशात वापरले जाणारे सांकेतिक चिन्हे आणि खुणा
(D) भारतीय हवामान उपग्रहांची ओळख: Kalpana-1, INSAT-3D, INSAT-3DR, INSAT-3DS

प्रकरण 6.............................................................0
भारतीय हवामान दर्शक नकाशा आणि उपग्रह प्रतिमांचे वाचन
(Interpretation of IMD Weather Map and Images)
(A) भारतीय हवामान दर्शक नकाशा वाचन:
(i) जुलै महिन्याचा (पावसाळा) हवामान नकाशा
(ii) जानेवारी महिन्याचा (हिवाळा) हवामान नकाशा
(B) भारतीय हवामानदर्शक उपग्रह प्रतिमा
(i) इन्फ्रारेड-1 वाहिनी / अवरक्त वाहिनी-1
(ii) दृश्यमान वाहिनी / व्हिजिबल चॅनल
(iii) जलबाष्प वाहिनी
(iv) ढगांच्या वरच्या थराचे प्रकाशमान तापमान

संदर्भ ग्रंथसूची........................................................0

💬

Chat with us