Your cart is empty now.
इ.स. 1206 पासून इ.स. 1757 पर्यंतचा भारताचा कालखंड हा मध्ययुग समजला जातो. अरब मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणाच्यावेळी भारतात विभिन्न राज्ये होती. त्यांच्यात राजकीय एकतेचा अभाव होता. या काळात मुसलमान आक्रमक इस्लाम धर्माचा झेंडा हातात घेऊन आपल्या सैन्यानिशी भारताच्या सरहद्दीवर येऊन धडकले. मुहम्मद बिन कासिम, महंमद गझनी, कुतुबुद्दीन ऐबक, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक या आक्रमकांनी अनेक आक्रमणे करून संपत्तीची लूट केली. तुघलक साम्राज्याच्या विघटनातून दक्षिणेत बहमनी व विजयनगर साम्राज्याचा उदय झाला. इ.स. 1526 साली बाबर यांनी भारतावर आक्रमण करून दिल्ली सल्तनतचा शेवट केल्याने मुघल सत्तेचा ध्वज फडकू लागला. भारतात इस्लामी सत्ता स्थापन होण्यापूर्वी भारतीय कलेचा विकास झालेला होता. मध्ययुगात होऊन गेलेल्या अनेक साधुसंतांनी आपल्या काव्याद्वारे जनतेला उपदेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेविरुद्ध संघर्ष करुन मराठा सत्तेची स्थापना केली. तद्नंतर छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी अमूल्य योगदान देवून मुघल सत्ता खिळखिळी केली. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये महाराजा रणजितसिंह यांनी मुघलांना प्रखर विरोध करून स्वतंत्र शीख सत्तेची पायाभरणी केली. तद्नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कटकारस्थाने करून भारतात सत्ता स्थापन केली. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सल्तनत आणि मुघल काळातील राजकीय इतिहास, सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती, प्रशासन, कला, वास्तुकला व स्थापत्य कलेची सविस्तर माहिती दिली आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.